Weekly Horoscope 6 To 12 April 2026: सध्या एप्रिल महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू आहे, आणि नवीन आठवडा अवघ्या काही दिवसांतच सुरू होतोय. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एप्रिल महिन्याचा 6 ते 12 एप्रिल 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे हा नवीन आठवडा (Weekly Horoscope) मेष ते कन्या अशा सर्व 6 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिलच्या दुसऱ्या या आठवड्यात करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होईल, पण कामाचा ताणही वाढू शकतो. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा, अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, मात्र थकवा जाणवू शकतो. प्रेमसंबंधात गैरसमज टाळा.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा स्थिरतेचा आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती दिसेल. पैशाची आवक वाढेल आणि जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात चांगली प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा नशीब पालटणारा ठरेल, नवीन लोकांशी ओळख होईल आणि त्याचा भविष्यात फायदा होईल. करिअरमध्ये बदलाचे संकेत आहेत. नोकरी शोधणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाबतीत थोडी चढ-उतार राहील. प्रवासाचे योग आहेत. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा थोडा आव्हानात्मक असू शकतो. कामात अडथळे येऊ शकतात, पण संयम ठेवा. आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. घरात काही जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः पचनासंबंधी त्रास टाळा. मित्रांची मदत मिळेल.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा दुसरा आठवडा यशाचा आहे. करिअरमध्ये प्रगती आणि नवीन संधी मिळतील. व्यवसायात नफा होईल. प्रेमसंबंध मजबूत होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. प्रवासाचे योग आहेत. आरोग्य चांगले राहील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा दुसऱ्या आठवड्यात कामावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. कुटुंबात काही किरकोळ वाद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या आणि योग्य आहार घ्या.

हेही वाचा

Weekly Horoscope: एप्रिलचा दुसरा आठवडा 6 राशींसाठी बंपर लाभाचा! ग्रहांचे पॉवरफुल संकेत, कोणाची लॉटरी? कोणाचं नुकसान? 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)