Weekly Horoscope 4 To 10 May 2026: अखेर मे महिन्याची (May 2026) सुरूवात झाली आहे, 4 ते 10 मे 2026 हा आठवडा अनेकांसाठी नशीब पालटणारा तसेच प्रगती देणारा ठरणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात ग्रहस्थिती थोडी बदलती असल्यामुळे अनेक राशींना नवीन अनुभव आणि संधी मिळू शकतात. या काळात संकष्टी चतुर्थी येत असल्याने हा आठवडा तितकाच खास राहील, ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे मे महिन्याचा चा नवा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी या आठवड्यात निर्णय घेताना घाई टाळा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण मेहनतीचे फळ मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. नातेसंबंधात गैरसमज टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी भाग्यशाली ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, आर्थिक लाभ आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढलेला जाणवेल. सामाजिक वर्तुळ वाढेल. कामात चांगले परिणाम मिळतील. काहींना चांगली बातमी मिळू शकते.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी या आठवड्यात भावनिकदृष्ट्या थोडे संवेदनशील राहाल, पण हळूहळू मानसिक स्पष्टता येईल. कुटुंबाशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. आरोग्याकडे लक्ष द्या.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी हा आठवडा काम आणि वैयक्तिक आयुष्य यामध्ये संतुलन ठेवणे गरजेचे आहे. अचानक बदल होऊ शकतात, त्यामुळे संयम ठेवा. आर्थिक बाबतीत सावध रहा.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा तुमच्यासाठी सकारात्मक आहे. करिअरमध्ये प्रगती, सहकाऱ्यांचे सहकार्य आणि आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात भावनिक चढ-उतार कमी होत जातील. आर्थिक स्थिरता मिळेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी चांगला काळ आहे.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी हा आठवडा धैर्य ठेवणे गरजेचे आहे. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. घरात शांतता राखा. काही महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा संवाद कौशल्यामुळे कामे यशस्वी होतील. प्रवासाचे योग आहेत. नात्यांमध्ये सौम्यता ठेवा.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा बदल आणि यश देणारा ठरू शकतो. करिअरमध्ये मोठी संधी मिळू शकते. प्रेम आणि कुटुंबात स्थिरता येईल.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जीवनात काही गोष्टींचा शेवट आणि नवीन सुरुवात होऊ शकते. स्वतःकडे लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारेल.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामात यश मिळेल, पण थकवा जाणवू शकतो. खर्च वाढू शकतो, त्यामुळे आर्थिक नियोजन करा. मित्रांकडून मदत मिळेल. 

हेही वाचा

Rahu Mahadasha: 2026 ते पुढचे 18 वर्ष...राहू महादशेचा 4 राशींवर मोठा प्रभाव! मोठं यश की मोठी सत्त्वपरीक्षा? काय आहे ही महादशा? तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)