Weekly Horoscope 4 To 10 August 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा पवित्र महिना आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभांसह मोठ मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - सिंह राशीच्या लोकांनी प्रेमाच्या बाबतीत थोडा संयम बाळगावा. कोणत्याही गोष्टीत वर्चस्व गाजवणं पुढे महागात पडू शकतं. यासाठी पार्यनरचं मत सुद्धा विचारात घ्या. नात्याला वेळ द्या. 

करिअर (Carrer) - करिअरमध्ये अनेक नवीन संधी तुमच्या वाट्याला येतील. याचा वेळीच लाभ घ्या. तसेच, तुमच्यातील कलागुणांना चांगला वाव मिळेल. बॉसकडून कौतुक होईल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल. तसेच, हाती घेतलेलं काम न सोडण्याची तुमची जिद्दच तुम्हाला भविष्यात खूप उंचावर घेऊन जाईल.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत त़डजोड करु नका. ज्याप्रमाणे करिअरला प्राधान्य देता त्याचप्रमाणे आरोग्याचीही काळजी घेणं फार गरजेचं आहे. 

कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - पार्टनरच्या बाबतीत जास्त भावनिक विचार करु नका. थोडं प्रॅक्टिकल राहणंही गरजेचं आहे. अन्यथा लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. मनावर आणि भावनांवर नियंत्रण ठेवा. 

करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सहकाऱ्यांबरोबर चांगला ताळमेळ राहील. तसेच, बॉसकडून कौतुकही होईल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली भरभराट होईल. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. तसेच, पैशांची गुंतवणुकही तुम्हाला लाभदायी ठरु शकते. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पावसाळ्याचे दिवस सुरु असल्या कारणाने आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ खाणे टाळा. तसेच, मानसिक शांतीसाठी तुम्ही नियमित योगासन करणं गरजेचं आहे.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :  

Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचा आठवडा सावधानतेचा; तुमची 'ही' चूक महागात पडू शकते, साप्ताहिक राशीभविष्य