Weekly Horoscope 30 March To 5 April 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्याचा शेवटचा आणि एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 30 मार्च ते 5 एप्रिल 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे एप्रिलचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Continues below advertisement

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा पहिला आठवडा चांगला असणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुम्ही काही शॉर्टकटचे निर्णय अजिबात घेऊ नका. यामुळे तुमचंच नुकसान होऊ शकतं. घरातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार आणखी कसा वाढवता येईल याचा विचार करा. नवीन महिन्याचा पहिला आठवडा असल्या कारणाने तुम्ही एखाद्या संकल्पाची देखील सुरुवात करु शकता. प्रामाणिकपणे केल्यास तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळेल. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या कालावधीत तुमचं मन स्थिर नसेल. तुम्हाला सतत बैचेन जाणवेल. तुमच्या व्यवसायात देखील अनेक चढ-उतार तुम्हाला पाहायला मिळतील. मात्र, खचून जाऊ नका. प्रामाणिकपणे काम करत राहा. कामाच्या निमित्ताने बाहेर पडल्यास घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. तसेच, आरोग्याच्या बाबतीत तुम्ही सतर्कता बाळगण्याची गरज आहे. तुमच्या गोष्टींसाठी तुम्ही इतरांवर राहू नका. 

Continues below advertisement

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी एप्रिलचा पहिला आठवडा सामान्य असणार आहे. या कालावधीत तुमचा ना फायदा ना तोटा होणार आहे. या दरम्यान कोर्ट कचेरीच्या संदर्भातील वाद वाढण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला सपोर्ट मिळेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. तसेच, विद्यार्थ्यांसाठी सुट्टीचा काळ असल्याने ते आपले सुट्टी आनंदात घालवतील.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी एप्रिलचा नवीन आठवडा सावधानतेचा असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. तसेच, कोणाशीही रागाने बोलू नका. प्रेमाने संवाद साधा. जे लोक नोकरी बदलीचा विचार करतायत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळू शकते. प्रयत्नशील राहा. तुमच्यातील कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मित्र-मैत्रीणींचा सहवास तुमच्यासाठी लाभदायी ठरेल. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी एप्रिलचा पहिला आठवडा लाभदायी असणार आहे. याकाळात धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या. महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. या कालावधीत विनाकारण पैसे खर्च करु नका. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तसेच, तुम्ही हाती घेतलेल्या कार्याला चांगलं यश मिळेल. नशिबाची साथ तुमच्याबरोबर असेल. या काळात तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढलेली दिसेल. कामाच्या निमित्ताने परदेशात देखील जाण्याची संधी मिळू शकते. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी एप्रिलचा पहिला आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप