Weekly Horoscope 3 To 9 August 2026: ऑगस्टचा (July 2026) नवा आठवडा अखेर सुरू झाला आहे, ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर हा आठवडा अनेकांसाठी गेमचेंजर ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. या आठवड्यात कामिका एकादशी देखील येत आहे. त्यामुळे हा आठवडा कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी या आठवड्यात महत्त्वाचे निर्णय घेताना घाई टाळा. नोकरीत सहकाऱ्यांशी समन्वय राखणे आवश्यक आहे. व्यवसायात छोट्या अडचणी येऊ शकतात, पण संयम ठेवल्यास मार्ग निघेल. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने आर्थिक नियोजन करा. जोडीदाराशी मतभेद होऊ नयेत यासाठी संवाद महत्त्वाचा ठरेल. त्वचा किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी या आठवड्यात करिअर आणि आर्थिक क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठा व्यवहार यशस्वी ठरू शकतो. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. प्रवास लाभदायक ठरू शकतो..
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी या आठवड्यात नवीन अनुभव आणि प्रवासाचे योग आहेत. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागू शकतात. व्यवसायात विस्ताराचा विचार करू शकता, मात्र आर्थिक जोखीम टाळा. विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचा काळ आहे. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नातेसंबंध अधिक चांगले होतील. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत शुभ ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठी संधी, पदोन्नती किंवा नवीन नोकरीची शक्यता निर्माण होईल. व्यवसायात नफा वाढेल आणि नवीन ग्राहक मिळू शकतात. आर्थिक नियोजन यशस्वी ठरेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा आणि मुलाखतीत यश मिळू शकते. आत्मविश्वास वाढेल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी या आठवड्यात नवीन कल्पना आणि सर्जनशील विचारांमुळे कामात प्रगती होईल. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसायात नवीन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने नियमित व्यायाम करणे फायदेशीर ठरेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी हा आठवडा आध्यात्मिक आणि मानसिक समाधान देणारा ठरू शकतो. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. व्यवसायात संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. प्रेमसंबंधात विश्वास आणि जवळीक वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित प्रगती दिसेल. ध्यान, योग आणि नियमित दिनचर्येमुळे आरोग्य चांगले राहील.
हेही वाचा :
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! पॉवरफुल हंस-बुधादित्य राजयोगांचा डबल धमाका, पैसा, नोकरी, प्रेम फळफळणार...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
