Weekly Horoscope 3 To 9 August 2026: ऑगस्ट (August 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होणार आहे, ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. या आठवड्यात कामिका एकादशी देखील येत आहे. त्यामुळे हा आठवडा कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना नव्या आठवड्यात करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमचे मत महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात विस्ताराचे नियोजन यशस्वी होईल. जोडीदाराशी संवाद वाढवा, त्यामुळे मतभेद टाळता येतील. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा. प्रवासाचा योग संभवतो.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी हा आठवडा महत्त्वाचे निर्णय घाईत घेऊ नका. व्यवसायात स्पर्धा वाढेल, पण योग्य नियोजनामुळे यश मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. धार्मिक कार्यात सहभाग घेण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या छोट्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी हा आठवडा नवीन सुरुवातीसाठी उत्तम आहे. नोकरीत बदलाचा विचार करत असाल तर सकारात्मक घडामोडी घडू शकतात. व्यवसायात नफा वाढेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण अनुभवता येतील. आर्थिक लाभाची शक्यता असून गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढेल, पण त्याचे चांगले परिणामही दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसायात दीर्घकालीन नियोजन फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती स्थिर राहील. कुटुंबातील एखादा आनंदाचा प्रसंग वातावरण प्रसन्न करेल. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करा.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी या आठवड्यात करिअरमध्ये प्रगतीचे नवे मार्ग खुलतील. व्यवसायात नवीन ग्राहक मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मित्रांच्या मदतीने महत्त्वाचे काम पूर्ण होईल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. आरोग्य चांगले राहील, मात्र झोपेची काळजी घ्या.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत लाभदायक ठरेल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात विस्तारासाठी अनुकूल वातावरण राहील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात मन रमेल. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. आठवड्याच्या शेवटी एखादी शुभ बातमी किंवा आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.. 

हेही वाचा :

Hindu Religion: देवघरातील देवांची मूर्ती 'या' दिवशी चुकूनही हलवू नये? देवांची स्वच्छता कोणत्या दिवशी करावी? मूर्ती कशा स्वच्छ कराव्यात? धार्मिक परंपरा...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)