Weekly Horoscope 29 June To 5 July 2026: जून महिन्याचे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै (June 2026) महिना हा अनेकांचे नशीब पालटणार आहे, जुलैचा पहिलाच आठवडा लवकरच सुरु होत आहे. ग्रहांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल, या नव्या आठवड्यात वटपौर्णिमा आणि संकष्टी चतुर्थी असे सण येत आहेत. त्यामुळे हा नवीन आठवडा कोणकोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यासाठी मेष ते कन्या अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात.  

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक किंवा नवीन करार मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढण्याचे संकेत आहेत, मात्र अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात जोडीदाराशी संवाद वाढेल आणि गैरसमज दूर होतील. आरोग्य चांगले राहील, पण धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो.

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा स्थैर्य आणि समाधान देणारा ठरेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि व्यवसायात विस्ताराचे नियोजन यशस्वी होऊ शकते. आर्थिक स्थिती मजबूत राहील, तसेच बचत करण्यावर भर द्याल. प्रेम जीवनात विश्वास आणि जवळीक वाढेल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. आरोग्याच्या बाबतीत पचनाशी संबंधित किरकोळ त्रास होऊ शकतो, त्यामुळे आहाराकडे लक्ष द्या.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी जुलैचा पहिलाच आठवडा संधींचा ठरेल. करिअरमध्ये नवीन प्रकल्प हाती येऊ शकतात. विद्यार्थ्यांसाठी अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने काळ अनुकूल आहे. आर्थिकदृष्ट्या अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधात नवे निर्णय घेतले जाऊ शकतात आणि अविवाहितांना योग्य जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव कमी होईल आणि आत्मविश्वास वाढेल. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा मेहनतीचे योग्य फळ मिळेल. नोकरीत पदोन्नती किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक बाबतीत खर्च वाढू शकतो, त्यामुळे बजेटचे नियोजन आवश्यक आहे. प्रेम जीवनात जोडीदारासोबत भावनिक नाते अधिक मजबूत होईल. आरोग्याच्या बाबतीत सांधेदुखी किंवा पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी हा आठवडा यश आणि प्रतिष्ठा मिळवून देणारा ठरू शकतो. नेतृत्वगुणांमुळे महत्त्वाची जबाबदारी मिळेल. व्यवसायात मोठे व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे नवे मार्ग खुलतील आणि अडकलेले पैसे परत मिळू शकतात. प्रेम जीवनात रोमँटिक वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील, मात्र कामाचा ताण वाढू शकतो. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरेल. नोकरीत नवीन संधी मिळू शकतात आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. व्यवसायात विस्तारासाठी योग्य वेळ आहे. आर्थिकदृष्ट्या स्थैर्य राहील आणि दीर्घकालीन गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो. प्रेम जीवनात संवादामुळे नात्यातील विश्वास वाढेल. आरोग्याच्या बाबतीत पोटाशी संबंधित किरकोळ तक्रारी जाणवू शकतात.

हेही वाचा

July 2026 Horoscope: जुलै महिना तुमच्यासाठी कसा असेल? मेष ते मीन राशींसाठी महत्त्वाची अन् मोठी भविष्यवाणी...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)