Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : नवीन आठवडा सुरू होणार आहे. जुलै 2024 चा शेवटचा आठवडा आणि ऑगस्टचा पहिला आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra Weekly Horoscope)


तूळ राशीच्या लोकांसाठी नवा आठवडा शुभ ठरेल. तुमच्या करिअरशी संबंधित कोणतीही मोठी इच्छा या काळात पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. घरात आनंदाने वेळ घालवाल.


वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शॉर्टकट टाळण्याचा असेल, अन्यथा काही नुकसान होऊ शकतं. प्रवासामुळे तुम्हाला थकवा येऊ शकतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही. वाहन चालवताना काळजी घ्या. तुमच्या प्रियकराला भेटण्यात तुम्हाला अडचणी येऊ शकतात.


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


धनु राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात कोणत्याही प्रकारे बेफिकीर राहू नये. जर तुम्ही कोणतंही काम करण्याचा विचार करत असाल तर ते अर्धवट मनाने करू नका, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या काही चुकीमुळे तुमच्या बॉसचा ओरडा पडू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा.


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभ राहील. तुम्ही नोकरी करत असाल तर या आठवड्यात तुमची बदली होऊ शकते. व्यवसायासाठी केलेला प्रवास चांगला ठरेल. तरुणाईचा हा आठवडा मौजमजेत जाईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. कौटुंबिक समस्या सोडवताना कुटुंबियांच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संमिश्र जाईल. कोणाच्याही प्रभावाखाली येऊन कोणताही निर्णय घेऊ नका. तुमच्यावर कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या सोपावल्या जाऊ शकतात. या आठवड्यात तुम्ही जास्त भावनिक होऊ नये. राग बाजूला ठेवून कोणतंही काम करा. या आठवड्यात प्रियकरासोबत मतभेद होऊ शकतात.


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला राहील. या आठवड्यात तुम्हाला नोकरीच्या चांगल्या संधी मिळतील, परंतु ही संधी तुमच्या हातून निसटू देऊ नका, जर तुम्ही कठोर परिश्रम केले तर तुम्हाला त्यात अपेक्षित यश मिळू शकतं. एखाद्या व्यक्तीबद्दल आकर्षण वाढू शकतं. तुमचं आरोग्य या काळात चांगलं राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 29 July To 04 August 2024 : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असणार? जाणून घ्या लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक