Weekly Horoscope 28 July To 3 August 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. नुकतीच श्रावण महिन्याची देखील सुरुवात झाली आहे. हा आठवडा ग्रहांच्या दृष्टीने हा आठवडा फार महत्त्वाचा आहे. कारण या दरम्यान मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच,  त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी नवीन आठवड्यात काळजी घ्यावी लागेल. कारण या आठवड्यात मानसिक दबाव असू शकतो. मात्र जुने वाद मिटू शकतात, परंतु कोणताही निर्णय घेताना घाई करू नका. कामाच्या ठिकाणी स्थिरता राहील. आरोग्याबाबत काळजी घ्या. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांसाठी जुलैचा शेवटचा आठवडा खास असेल, तुम्ही कुटुंबासोबत गोड वेळ घालवाल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये उत्साह असेल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी जुलैच्या शेवटच्या आठवड्या दरम्यान सुरुवातीला मंदी असू शकते, परंतु नंतर प्रगती दिसून येईल. नोकरी बदलाचा विचार शक्य आहे. आरोग्य सुधारेल. तुमचे जुने मित्र - मैत्रीण भेटू शकतात. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक ठरु शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. घरात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. हा आठवडा विद्यार्थी वर्गासाठी अनुकूल आहे. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी जुलैच्या नवीन आठवड्यात खर्च जास्त असू शकतो, परंतु उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील निर्माण होतील. नातेसंबंधांमध्ये गैरसमज टाळा. करिअर मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असेल.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवड्यात योजना प्रत्यक्षात येण्याची वेळ आली आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद वाढेल. गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करा. 

हेही वाचा :           

Weekly Horoscope: जुलैचा शेवटचा आठवडा, ऑगस्टची सुरूवात लय भारी! 12 राशींसाठी आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)