Weekly Horoscope 28 April To 04 May 2025 : एप्रिल महिन्याचा शेटचा आठवडा आणि मे महिन्याचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा आठवडा काहींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. या ठिकाणी आपण मिथुन आणि कर्क राशीसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope)व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे. या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत.  

मिथुन रास साप्ताहिक राशीभविष्य (Gemini Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तुम्हाला तुमच्या नात्यात सामंजस्य दाखवण्याची गरज आहे. तुमच्या पार्टनरबरोबर तुमचे काही छोटे-मोठे वाद होऊ शकतात. यासाठी तुमच्या पार्टनरचा चांगला मित्र-मैत्रीण होण्याचा प्रयत्न करा. तरच तुमचं नातं टिकून राहील.

करिअर (Carrer) - कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, काही कामासाठी तुम्हाला अतिरिक्त वेळ द्यावा लागू शकतो. ऑफिसमध्ये तुमचं टीमवर्क दिसून येईल. विद्यार्थ्यांच्या करिअरला नवीन दिशा मिळेल.

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. विविध स्त्रोतांमधून तुम्हाला धनलाभ मिळेल. तसेच, नवीन बिझनेस डीलसाठी तुम्हाला अनेक प्रस्ताव येतील. या सगळ्याचा तुम्ही नीट विचार करुन निर्णय घ्या. 

आरोग्य (Health) - तुमच्या आरोग्याची तुम्ही वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे. इतरांवर अवलंबून राहू नका. तसेच, निरोगी जीवनशैलीचे पालन करा. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा. 

कर्क रास साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या पार्टनरच्या बाबतीत तुम्ही थोडं रोमॅंटिक असणं गरजेचं आहे. नातं टिकून राहण्यासाठी नात्याला वेळ द्या. पार्टनरशी योग्य संवाद साधा. तसेच, तुमचं वैवाहिक जीवन चांगलं राहील.

करिअर (Career) - तुमच्या करिअरमध्ये छोटे-मोठे अडथळे निर्माण होतील. तसेच, पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताना तुमच्या पार्टनरवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. 

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती या आठवड्यात चांगली असेल. मात्र, पैशांचा अतिवापर करु नका. जे लोक व्यवसाय करतायत त्यांच्यासाठी पैशांची गुंतवणूक करणं थोडं कठीण असेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी परिस्थिती चांगली होईल. 

आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील. संतुलित जीवनशैलीचा वापर करा. तसेच, तुमच्या आरोग्यात हळुहळू सुधारणा होताना दिसेल. त्वचेच्या संबंधित विकार दूर होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:  

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा नेमका कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक