Weekly Horoscope 27 July To 2 August 2026: जुलै (July 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला आहे, ज्योतिषशास्त्रानुसार हा आठवडा अनेकांचे नशीब पालटणारा ठरणार आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींमुळे काही राशींसाठी हा आठवडा भाग्याचा ठरेल, तर काहींना आव्हानात्मक ठरेल. या आठवड्यात गुरूपौर्णिमेचा सण देखील सण येत आहे. त्यामुळे हा आठवडा कोणत्या राशींसाठी कशाप्रकारे बदल घेऊन येतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज आपण तूळ ते मीन अशा सहा राशींचं साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घेऊयात. 

Continues below advertisement

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीच्या लोकांना नव्या आठवड्यात व्यवसायातून मोठा लाभ मिळू शकतो. नोकरीत बढती किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. प्रेमसंबंधात विश्वास महत्त्वाचा ठरेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी हा आठवडा करिअरमध्ये काही आव्हाने येतील, मात्र योग्य नियोजनामुळे त्यावर मात कराल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल. नवीन ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. आरोग्याच्या बाबतीत नियमित तपासणी आवश्यक वाटल्यास विलंब करू नका.

Continues below advertisement

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने राहील. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. प्रेमजीवनात आनंददायी क्षण अनुभवता येतील. प्रवासातून लाभ मिळू शकतो.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे योग्य नियोजन करा. वरिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. कुटुंबात एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या आणि थकवा वाढू देऊ नका.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी या आठवड्यात नवीन कल्पनांना यश मिळेल. व्यवसायात विस्ताराची संधी मिळू शकते. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. आध्यात्मिक कार्यात मन रमू शकते.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी आठवड्याच्या सुरुवातीला काही अडथळे येऊ शकतात, पण शेवटपर्यंत परिस्थिती अनुकूल होईल. नोकरीत चांगली संधी मिळू शकते. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबासोबत आनंददायी वेळ घालवाल. आरोग्यासाठी नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर भर द्या. 

हेही वाचा :

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 5 राशींची पाचही बोटं तुपात! आजपासून जुलैचा शेवटचा आठवडा नशीब पालटणार, पैसा, नोकरी.. साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)