Weekly Horoscope 27 January To 02 February 2025 : जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यालाही सुरुवात होणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. जानेवारीचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra Weekly Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत सुरु राहील. तसेच,आठवड्याच्या सुरुवातीला तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील. मात्र, हळूहळू पैशांची चणचण जाणवू लागेल. तसेच, घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होऊ शकतो. तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. मुलांबरोबर नवीन आठवडा चांगला जाईल. शनीदेवाची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे.


वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक असणार आहे. या काळात तुमच्या आरोग्यात चढ-उतार जाणवू शकतो. तसेच, जर तुम्हाला पैशांची गुंतवणूक करायची असेल तर हा काळ चांगला ठरेल. तुमचे अनेक दिवसांपासून रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. धार्मिक कार्यात तुमचं मन जास्त रमेल. 


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा काहीसा मध्यम फलदायी असणार आहे. या आठवड्यात तुमची तब्येत देखील सामान्य असेल. तसेच, तुमची आर्थिक स्थिती चांगली असल्या कारणाने जर तुम्हाला एखाद्या प्रॉपर्टीमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर त्यासाठी हा चांगला काळ असणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुमची अनेक लोकांशी भेटीगाठी होतील.


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही. तसेच, तुमच्या व्यवसायाचा अधिक चांगला विस्तार होईल. या आठवड्यात तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करण्याचे अनेक संकेत मिळतील. त्याकडे दुर्लक्ष करु नका.


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला नवीन जोडीदाराची साथ लाभेल. त्यामुळे तुम्ही फार आनंदी असाल. तसेच, विद्यार्थ्यांना देखील शाळेत नवीन गोष्टी शिकता येतील. सरकारी योजनांचा तु्म्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, परदेशात जाण्याची संधी चालून येणार आहे. 


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात तुमच्या व्यवसायाचा अधिक चांगला विस्तार होईल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर्स मिळत राहतील. त्यामुळे तुम्ही फार व्यस्त असाल पण फार खुश असाल. आठवड्याच्या मध्यात तुमच्या आरोग्यात तुम्हाला चढ-उतार जाणवू शकतो. अशा वेळी आरोग्याची काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य