Weekly Horoscope 27 April To 3 May 2026: एप्रिलचा (April 2026) शेवटचा आठवडा अखेर सुरु झाला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 27 एप्रिल ते 3 मे च्या या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. एप्रिल महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा अत्यंत खास असेल. तुमची आर्थिक परिस्थिती सुधारेल. नातेसंबंधांमध्ये उत्साह येईल. लांबचा प्रवास शक्य आहे. अनुभवी व्यक्तीचा सल्ला फायदेशीर ठरेल.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा कामाच्या ठिकाणी आव्हाने येतील, पण संयम ठेवणे शक्य आहे. आपल्या प्रियजनांसोबतचे संबंध सौहार्दपूर्ण राहतील. आपल्या आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः दुखापत टाळा.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा लाभाचा राहील, परदेश प्रवास किंवा उच्च शिक्षणाच्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखी राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीसाठी हा आठवडा जुनी प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक गुंतवणुकीतून लाभ मिळेल. काही कौटुंबिक समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे संयम बाळगा. आरोग्य सामान्य राहील 

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवड्यात नवीन योजना यशस्वी होतील. व्यवसायात भरभराट होईल. मोठ्या धनलाभाचे संकेत मिळत आहेत. तुम्हाला मित्रांकडून पाठिंबा मिळेल. प्रेमसंबंधही अनुकूल राहतील. आरोग्य चांगले राहील.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा आध्यात्मिक भावनांचा प्रभाव राहील. कामाच्या ठिकाणी नवीन सुरुवात होऊ शकते. कुटुंबात शांतता आणि आनंद राहील. खर्च वाढू शकतो. बजेटचे नियोजन कराल.

ही वाचा

Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 3 राशींची लॉटरी! एप्रिलचा शेवटचा आठवडा, ग्रहांचे राजयोग, कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य वाचा

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)