Weekly Horoscope 27 April To 3 May 2026: आजपासून एप्रिलचा (April 2026) शेवटचा आठवडा लवकरच सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 27 एप्रिल ते 3 मे पर्यंतचा हा या महिन्याचा शेवटचा आठवडा असणार आहे. या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. एप्रिल महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी आठवड्याची सुरुवातीला तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही तुमच्या कामात अधिक उत्साही व्हाल. कुठूनतरी पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. व्यावसायिक आपल्या बोलण्याने विक्री वाढवतील. धनलाभ होण्याची मोठी शक्यता आहे. नोकरीत नवीन ऑफर्स मिळतील. कुटुंबात आनंद नांदेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी या आठवड्यात, तुम्ही आराम करण्याच्या आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याच्या मनस्थितीत असाल. ही चांगली गोष्ट असेल, पण महत्त्वाची कामे करायला विसरू नका. तुमचे व्यक्तिमत्व सुधारेल, प्रेम वाढेल आणि आर्थिक स्थिरता येईल. जे नोकरीत आहेत, त्यांच्यासाठी पदोन्नतीचा मार्ग मोकळा होईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा तुमची लोकप्रियता वाढवेल. महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. तुम्ही धाडसी निर्णय घ्याल. करिअरमध्ये प्रगती होईल. पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. उत्पन्नात कायमस्वरूपी वाढ होऊ शकते.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवड्यात विचारपूर्वक निर्णय घेणे फायदेशीर ठरेल. तुमची दूरदृष्टी किंवा अंतरात्मा तुम्हाला योग्य निर्णय घेण्यास मदत करेल. तुम्ही कधीकधी जास्त भावनिक होऊ शकता, ज्यामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होईल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी एप्रिलचा शेवटचा आठवडा आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आर्थिक बाबींमध्येही चांगली प्रगती होईल. तुमची जबाबदारी वाढेल आणि तुमच्या पदाला अधिक महत्त्व प्राप्त होईल. तुमची नेतृत्व कौशल्ये सुधारतील. आठवड्याच्या शेवटी तुम्ही अधिक भावनिक होऊ शकता..
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तुमची मनःस्थिती शांत राहील. त्यानंतर, तुम्ही जलद निर्णय घ्याल आणि कामे पूर्ण कराल. पण बोलण्यात घाई करू नका. विचारपूर्वक बोला, नाहीतर तुम्ही गोष्टी बिघडवू शकता.
ही वाचा
