Weekly Horoscope 26 January To 1 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जानेवारी (January 2026) महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारीपर्यंत हा नवीन आठवडा असणार आहे. या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. जानेवारी महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope)जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा फलदायी ठरणार आहे. या काळात करिअर असो वा तुमचा व्यवसाय दोन्ही ठिकाणी तुमची परिस्थिती अनुकूल असेल. या आठवड्यात तुम्हाला तुमची निर्णयक्षमता अधिक मजबूत करावी लागेल. कारण तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला सर्वस्वी तुम्ही जबाबदार असाल. अनेक विरोधक तुमच्या मार्गाला येतील. मात्र, तुमच्यातला आत्मविश्वास ठाम असावा. तसेच, मेहनत करत राहा देवी लक्ष्मी प्रसन्न होईलच. धार्मिक कार्यात आवड निर्माण होईल. 

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

वृषभ राशीसाठी नवा आठवडा काहीसा चढ-उताराचा असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अनेक संघर्ष करावे लागतील. मग ते नोकरीच्या बाबतीत असो वा तुमच्या वैयक्तिक आयुष्याबाबत. पैशांची गुंतवणूक करण्यासाठी हा काळ योग्य नाही. तसेच, आठवड्याच्या शेवटी पैशांच्या संबंधित तुम्हाला आर्थिक तंगी भासू शकते. त्यामुळे या काळात पैशांची कोणतीही देवाण-घेवाण करु नका. मेहनत करत राहा. तुम्हाला मेहनतीचं फळ मिळेल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा फार शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायात अनेक ऑर्डर्स तुम्हाला मिळतील. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, बॉसकडून तुमचं कौतुक केलं जाईल. या आठवड्यात तुमच्या महत्त्वाच्या कामांना आधी प्रोत्साहन द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. तसेच, मित्रांशी सामंजस्याने वागा. अनेक नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळेल. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी जानेवारीचा नवीन आठवडा आनंददायी असणार आहे. या आठवड्यात घरी पाहुण्यांची ये-जा असेल. घरात नवीन कार्य घेडल. त्यामुळे वातावरण आनंदी असेल. तुमच्या बिझनेसच्या बाबतीतही तुम्हाला काही महत्त्वाची आणि ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही अगदी ठाम राहाल. मुलांच्या कलागुणांचा विकास होईल. आरोग्याच्या बाबतीत दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा करु नका. तुम्हाला महागात पडू शकतं. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी जानेवारी महिन्याचे शेवटचे दिवस काहीसे आव्हानात्मक असतील. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. तसेच, तुम्ही घेतलेले निर्णय चुकीचेही ठरु शकतात. मात्र, खचून न जाता तुमची चूक सुधारा. नवीन गोष्टी शिकत राहा. सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, घरात आनंदी वातावरण राहील. तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झालेली दिसेल. तसेच, कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नका. तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. 

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीसाठी जानेवारीचा शेवटचा आठवडा सामान्य असणार आहे. या दरम्यान कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका. कारण नंतर तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार झालेला दिसेल. मुलांच्या बाबतीत तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तसेच, धार्मिक यात्रेत सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. नवीन गोष्टी शिकाल. जे सोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना नोकरी शोधण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. कामाच्या कामावर लक्ष केंद्रित करा. 

हे ही वाचा :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Horoscope Today 23 January 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 5 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; संध्याकाळपर्यंत मिळणार शुभ संकेत, आजचे राशीभविष्य