Weekly Horoscope 25 To 31 May 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिना हा अनेकांचे भाग्य पालटणारा ठरत आहे, अशात 25 ते 31 मे 2026 हा आठवडा लवकरच येत आहे, ज्योतिषींच्या मते, हा आठवडा अनेकांसाठी प्रगतीकारक ठरणार आहे. या आठवड्यात ग्रहस्थितीच्या प्रभावामुळे काही राशींना करिअरमध्ये प्रगतीचे संकेत मिळतील, तर काहींना खर्च आणि नातेसंबंधात संयम ठेवावा लागेल. विशेषतः ग्रहांच्या विविध राजयोगामुळे काही राशींना लाभदायक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.. मे महिन्याचा चा नवा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते मीन अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मेष राशीसाठी 25 ते 31 मे या आठवड्यात कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास वाढेल. वरिष्ठांकडून कौतुक होण्याची शक्यता आहे. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल, मात्र अनावश्यक खर्च टाळा. प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद महत्त्वाचा ठरेल

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीसाठी हा आठवडा कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. प्रलंबित कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभदायक व्यवहार घडू शकतात. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सकारात्मक आहे. जोडीदारासोबत वेळ घालवल्याने नात्यात गोडवा वाढेल.

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन ओळखी आणि संपर्क भविष्यात फायदेशीर ठरतील. नोकरीत बदलाचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक लाभाचे योग आहेत. प्रवासाचे योग संभवतात. आरोग्याची विशेष काळजी घ्या.

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कर्क राशीसाठी हा आठवडा भावनिक निर्णय घेण्याऐवजी व्यवहारिक विचार करा. कुटुंबीयांची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी स्पर्धा वाढेल, पण तुमची मेहनत यश देईल. गुंतवणूक करताना सावध राहा. प्रेम जीवनात स्थैर्य राहील.

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, सिंह राशीसाठी हा आठवडा करिअरमध्ये मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. तुमच्या नेतृत्वगुणांमुळे महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळू शकतात. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. मित्रांकडून मदत मिळेल. आरोग्य चांगले राहील.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कन्या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे वेळेचे नियोजन आवश्यक आहे. घरातील वातावरण शांत राहील. व्यवसायात नवीन कल्पनांचा फायदा होईल. प्रेमसंबंधात गैरसमज टाळा. आरोग्यासाठी पुरेशी झोप घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, तूळ राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भागीदारीत केलेले काम फायदेशीर ठरेल. आर्थिक व्यवहारांमध्ये यश मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. प्रवासातून लाभ मिळू शकतो.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, वृश्चिक राशीसाठी हा आठवडा भाग्याची साथ मिळेल. करिअर आणि शिक्षण क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात. नवीन योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मानसिक समाधान लाभेल.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा आठवडा धैर्य आणि संयम ठेवणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी काही अडथळे येऊ शकतात, पण प्रयत्न सुरू ठेवा. आर्थिक बाबतीत सावध राहा. धार्मिक किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा करिअरमध्ये नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. तुमचे संवादकौशल्य फायदेशीर ठरेल. आर्थिक स्थिती सुधारेल. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आरोग्य सामान्य राहील.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, कुंभ राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात नवीन कल्पना आणि योजनांमुळे प्रगती होईल. व्यवसायात फायदा मिळू शकतो. नातेसंबंध अधिक मजबूत होतील. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

ज्योतिषशास्त्रानुसार, मीन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत सुधारणा दिसेल. प्रेम जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील. आरोग्य चांगले राहील.

हेही वाचा

Navpancham Yog 2026: जून महिना येतोय, मेष, तूळसह 4 राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉईंट! शुक्र-शनिचा पॉवरफुल नवपंचम दृष्टी योग, पैसा, नोकरी, प्रेमात भरभराट, तुमची रास?

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)