Weekly Horoscope 25 To 31 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभ आहेत. तसेच, शुभ ग्रहांचं संक्रमण देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope)जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या लव्ह लाईफमध्ये स्पष्टता असणं गरजेचं आहे. तसेच, पार्टनरवर तेवढाच विश्वास ठेवणं गरजेचं आहे. विनाकारण संशय घेऊ नका. यामुळे नातं तुटण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत शिस्तप्रिय राहाल. तुमची ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, ज्या लोकांपासून तुम्हाला त्रास होतो अशा लोकांपासून आत्तापासूनच दूर राहा. नोकरीत बदल घडतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, पैशांचा जपून वापर करणं गरजेचं आहे. त्यामुळे खर्च कमी करा. गरज असल्यास वस्तू खरेदी करा. नवीन ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या आरोग्यावर भर देणं गरजेचं आहे. या काळात तुम्ही संतुलित आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी वर्कआऊटवर लक्ष द्या. आणि भरपूर पाणी प्या. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये बदल करा.
वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीलाच पार्टनरकडून छान सरप्राईज भेट मिळेल. त्यामुळे तुमचा संपूर्ण आठवडा चांगला जाणार आहे. या काळात पार्टनरबरोबर तुम्ही नवीन बिझनेस सुरु करण्याचा किंवा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करु शकता.
करिअर (Career) - या आठवड्यात तुमच्यामध्ये लीडरशिप क्वालिटी दिसून येईल. तुमच्या नेतृत्वात तुम्ही चांगलं काम करु शकाल. त्याचप्रमाणे, ध्येयावर देखील लक्ष केंद्रित करणं फार गरजेचं आहे. सहकाऱ्यांशी प्रेमाने वागा.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुमचा कल जास्तीत जास्त गुंतवणुकीकडे असणार आहे. त्यामुळे लवकरच त्यातून तुम्हाला चांगला नफा मिळेल. तसेच, लवकरच तुमची आर्थिक स्थिती सुधारेल.
आरोग्य (Health) - ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी या आठवड्यात आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पावसात भिजू नये. तसेच, घरातील जेवणाचा आस्वाद घ्या. अन्यथा तुम्हाला साथीचे आजार उद्भवू शकतात.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
