Weekly Horoscope 25 To 31 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. तसेच, गणेशोत्सवाचा सणदेखील साजरा केली जाणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात पार्टनरबरोबर कनेक्शन मजबूत ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही सिंगल असाल तर तुम्हाला या आठवड्यात चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता आहे.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. यासाठी तुम्ही तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचंआहे. तसेच, जर तुम्हाला नोकरी स्विच करायची असेल तर ही चांगली वेळ आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुम्हाला कोणतीच अडचण येणार नाही. बाप्पाच्या कृपेने तुमची सगळी कामे सुरळीत मार्गी लागतील. तसेच, गरजूंना दान करण्यासाठी देखील तुम्ही तत्पर असाल.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य देखील चांगलं असणार आहे. तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलवर लक्ष देण्याची गरज आहे. नवीन आठवड्याची सुरुवात व्यायामाने करु शकता.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या राशीच्या लोकांचे आपल्या पार्टनरबरोबर चांगले संबंध असतील. तुमच्या पार्टनरच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच, नातं सुधारण्याची संधी द्या.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत हा आठवडा तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमचं नेतृत्व दिसून येईल. तुमच्या बॉसकडून तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, आठवड्याच्या शेवटी खूप पैसे खर्च केले जाऊ शकतात. अशा वेळी पैशांचा जपून वापर करा. तसेच, नवीन वस्तू खरेदी करण्याआधी त्याची खरंच गरज आहे का हे स्वत:ला विचारा.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे. पण, तुमच्या डाएटवर तुम्ही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, नियमित योग करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :