Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 : नोव्हेंबरचा नवीन आठवडा सुरु व्हायला अवघे काही दिवसच शिल्लक आहे. हा आठवडा फार खास असणार आहे. अनेक राशींसाठी हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. नोव्हेंबरचा तिसरा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra Weekly Horoscope) 


तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा येणारा आठवडा मध्यम फलदायी राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या कामाच्या ठिकाणी काही बदलांमुळे किंवा अतिरिक्त जबाबदाऱ्यांमुळे तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. घरातही किरकोळ वाद होतील. अशा वेळी तुम्हाला एक-एक गोष्टी मोठ्या समजुतीने आणि शांत मनाने सोडवाव्या लागतील. तुम्हाला घर आणि कामाच्या ठिकाणी सर्वांशी उत्तम समन्वय राखावा लागेल. नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि कामाच्या ठिकाणी संतुलन राखण्यात अडचणी येऊ शकतात. व्यवसायाशी संबंधित लोकांनी घाईत कोणतंही मोठं पाऊल उचलू नये, अन्यथा फटका बसू शकतो.


वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा हा आठवडा एका चांगल्या बातमीने सुरू होईल. नोकरदार लोकांना या काळात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नोकरीच्या ठिकाणी सर्वांचं पूर्ण सहकार्य मिळेल. लोक तुमच्या कामाची प्रशंसा करतील. जे लोक बऱ्याच दिवसांपासून नोकरी बदलण्याचा विचार करत होते त्यांना या आठवड्यात चांगली संधी मिळू शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना अचानक मोठं पद किंवा जबाबदारी मिळू शकते. जर तुम्ही खूप दिवसांपासून जमीन, इमारत किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या आठवड्यात तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना अपेक्षित यश मिळू शकेल.


धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)


धनु राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबरचा हा आठवडा संमिश्र राहील. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी धावपळ करावी लागेल. या काळात डोक्यावर अतिरिक्त कामाचा भार असेल, ज्यामुळे केवळ मानसिकच नाही तर शारीरिक थकवा देखील येईल. नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा नोकरीत बदलाची अपेक्षा करणाऱ्या लोकांना अजून थोडी वाट पहावी लागेल. आठवड्याच्या शेवटी तुमचे विरोधक सक्रिय होतील आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापासून दूर करण्याचा प्रयत्न करू शकतात. अशा स्थितीत तुम्हाला कामाच्या ठिकाणी लोकांच्या छोट्या गोष्टींना महत्त्व न देता तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावं लागेल. या आठवड्यात लव्ह लाईफमध्ये थोड्या अडचणी जाणवतील.


मकर रास (Capricorn Weekly Horoscope)


मागील आठवड्याच्या तुलनेत नोव्हेंबरचा हा आठवडा मकर राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ आणि फलदायी ठरेल. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत काही वाद सुरू असतील तर ते वरिष्ठ  व्यक्तीच्या मदतीने सोडवले जातील. व्यापारी लोकांचे पैसे बाजारातून अनपेक्षितपणे बाहेर येतील. या काळात तुम्ही एखाद्या योजनेत पैसे गुंतवू शकता, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात मोठा लाभ मिळू शकेल. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि सहकाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करतील. तुमच्या लव्ह लाईफशी संबंधित समस्या दूर होतील, तुमचं कुटुंब तुमचं नातं स्वीकारू शकेल आणि तुमच्या लग्नाचा विचार करू शकेल. या काळात आरोग्य सामान्य राहील.


कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांना नोव्हेंबरच्या या आठवड्यात कोणतंही काम घाईने करणं टाळावं लागेल. कामाच्या ठिकाणी कोणतंही काम इतरांवर सोपवण्यापेक्षा स्वतः करणं चांगलं. या आठवड्यात तुमच्यावर दुसऱ्याकडून चुकीचा आरोपही होऊ शकतो, अशा परिस्थितीत अत्यंत सावधगिरीने आणि हुशारीने वागा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. या काळात वाहन जपून चालवा. व्यवसायाशी संबंधित लोकांनी या काळात पैशाच्या व्यवहारात अत्यंत सावधगिरीने करा, अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तुमची लव्ह लाईफ टिकवून ठेवायची असेल तर जोडीदाराच्या भावनांच्या काळजी घ्या.


मीन रास (Pisces Weekly Horoscope)


नोव्हेंबरच्या नवीन आठवड्यात मीन राशीच्या लोकांचं भाग्य उजळेल. जे लोक बऱ्याच दिवसांपासून मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांची इच्छा या आठवड्यात पूर्ण होऊ शकतात. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकतं. व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी आठवड्याचे मधले दिवस खूप शुभ राहतील. या काळात भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत असतील. आठवड्याच्या शेवटी घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे घरात आनंदाचं वातावरण राहील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. आरोग्य ठणठणीत राहील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope 25 November To 01 December 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य