Weekly Horoscope 24 To 30 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर (November) महिन्याचा चौथा आणि शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमचा भूतकाळ तुमच्या आयुष्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करु शकतो. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या नात्यात असाल तर तुमच्या भूतकाळाला दूर ठेवणंच योग्य राहील. अन्यथा त्याचा वर्तमानावर परिणाम होऊ शकतो. 

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. तसेच, घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घेऊनच निर्णय घ्या. तुमच्यातील कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न करा.

Continues below advertisement

आर्थिक स्थिती (Wealth) - पैशांच्या बाबतीत तुमची आर्थिक स्थिती चांगली असते. शेअर बाजारात तुम्ही गुंतवणूक करु शकता. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. फक्त तुमची मेहनत प्रामाणिक असावी. मोठा निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य चांगलं असेल. मात्र, थंडीचे दिवस सुरु असल्यामुळे तुम्हाला सांधेदुखीचा तसेच डिहायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. यासाठी सतत पाणी पित राहा. 

मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नात्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा तुमच्यासाठी सतर्कतेचा असणार आहे. त्यामुळे पार्टनरशी बोलताना थोडी सावधानता बाळगा. कारण तुमच्या पार्टनरमध्ये त्यावरुन गैरसमज निर्माण होऊ शकतो. 

करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी देखील सतत तुम्हाला कमजोर दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. अशावेळी स्वत:वर विश्वास असणं गरजेचं आहे. कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवू नका. 

आर्थिक स्थिती (Wealth) - पैशांच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. कोणालाही पैशांची देवाण घेवाण करु नका. तसेच, आर्थिक वादापासून दूर राहा. नवीन वस्तूंची खरेदी करताना सावधानता बाळगा.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात जरी तुमच्या आयुष्यात संघर्ष आले तरी कोणत्याही गोष्टीचा मानसिक ताण घेऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा. देवाचं नामस्मरण करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :     

Weekly Horoscope : तूळ ते मीन राशींसाठी नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा ठरणार गेमचेंजर; हातात पैसा येणार की जाणार? साप्ताहिक राशीभविष्य