Weekly Horoscope 24 To 30 November 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर (November) महिन्याचा चौथा आणि शेवटचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या प्रेमजीवनात किंवा वैवाहिक जीवनात कोणतेच अडथळे दिसणार नाहीत. या आठवड्यात पार्टनरप्रती चांगला श्रोता बनण्याचा प्रयत्न करा. तसेच, पार्टनरची कुटुंबियांशी भेट घडवून द्या.यामुळे पार्टनकचा विश्वास अधिक दृढ होईल.
करिअर (Career) - या आठवड्यात तुम्ही तुमच्या डेडलाईनवर लक्ष देणं गरजेचं आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची, परिश्रमाची परीक्षा घेतली जाईल. मात्र, तुमचा फोकस हलू देऊ नका. आयटी, मिडिया आणि कलाकार लोकांसाठी हा आठवडा लाभदायी राहील.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास तुमची स्थिती चांगली असेल. देवी लक्ष्मीच्या कृपेने घरात धनसंपत्तीचं आगमन होऊ शकतं. तसेच, नवीन संपत्ती खरेदी करण्याबाबत तुमचा विचार चांगला आहे.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. मात्र, तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंकसारखी पेयं पिऊ नयेत.
वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पार्टनरबरोबर तुमचे छोट्या-छोट्या कारणावरुन खटके उडू शकतात. त्यामुळे जास्त प्रॅक्टिकल राहू नका. कधी कधी भावनांचाही विचार करणं गरजेचं आहे.
करिअर (Career) - या आठवड्यात तुम्हाला करिअरमध्ये पुढे जाण्याच्या अनेक संधी मिळतील. मात्र, योग्य वेळी योग्य संधीचा फायदा घेणं आणि त्यासाठी चांगली वेळ कोणती हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे.
आर्थिक स्थिती (Wealth) - पैशांच्या बाबतीत तुम्हाला थोड्याफार अडचणी येऊ शकतात. यासाठी पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. आठवड्याच्या शेवटी धनलाभ होण्याची शक्यता आहे.
आरोग्य (Health) - तुम्ही तुमच्या जीवनशैलीवर लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी बाहेरच्या तेलकट आणि तिखट पदार्थांचं सेवन करु नका. आरोग्याची वेळीच काळजी घेणं गरजेचं आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :