Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा कसा असणार? कोणत्या राशी होणार मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 23 February To 1 March 2026 : फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 23 February To 1 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा लवकरच संपणार असून मार्च महिन्याला सुरुवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 23 फेब्रुवारी ते 1 मार्च 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशीबाची साथ मिळेल. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा (Weekly Horoscope) मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. तुमचं ध्येय तुम्हाला या आठवड्यात पूर्ण करता येईल. तसेच, आठवड्याच्या शेवटी तुम्ही काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कामानिमित्त प्रवासाचे योग जुळून येतील.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा निर्णायक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही काही महत्त्वाच्या निर्णयात सहभागी व्हाल. पैशांच्या बाबतीत थोडासा कंजूषपणा तुमच्यात असेल. मात्र, जवळच्या व्यक्तींसाठी तुम्ही पैसे खर्च करण्यात मागे-पुढे पाहणार नाहीत. नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशनची संधी मिळेल. तसेच, आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळतील. संवाद साधल्याने तुमच्या विचारात आणखी भर पडेल. जवळच्या नातेवाईकांची भेट घ्याल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी लाभदायी ठरेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा सामान्य असणार आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. नवीन योजनांचा तुम्ही स्वीकार कराल. तसेच, आर्थिक बाबतीत निर्णय घेताना किंवा पैशांची गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचं मत विचारात घ्या. विनाकारण त्रागा करु नका. तुमच्या कामाशी काम ठेवा. एखाद्याच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलू नका.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीसाठी फेब्रुवारीचा आठवडा लाभदायक असणार आहे. तुमच्यातील कलागुणांना चांगला न्याय मिळेल. तुमच्यातील आत्मविश्वास वाढलेला दिसून येईल. तसेच, नात्यात गोडवा निर्माण होईल. सरकारी योजनांचा लाभ घ्याल. परदेशात जाण्याची संधीदेखील तुम्हाला मिळू शकते. कोणतेही प्रयत्न करताना हार मानू नका.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता ऐकायला मिळेल. तसेच, व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. नवीन गोष्टी शिकण्यास तुम्ही फार उत्सुक असाल. तुम्हाला नोकरीत प्रमोशनही मिळू शकतं. त्यामुळे तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा. वेळेवर विश्रांती घ्या.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)




















