Weekly Horoscope 22 To 28 September 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, सप्टेंबर (September) महिन्याचा तिसरा आठवडा 15 ते 21 सप्टेंबर लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. तसेच, हा आठवड्यात पितृपक्ष असणार आहे. तसेच, या आठवड्यात सू्र्यग्रहणही होणार आहे. त्यामुळे सप्टेंबरचा हा आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्हलाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope)जाणून घ्या.

तूळ रास (Libra Weekly Horoscope)

तूळ राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात जोडीदाराचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. तसेच, तुमचे जुने वादविवाद लवकर मिटतील. पार्टनरशिपमध्ये तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करु शकता. तसेच, या काळात रागाच्या भरात घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होऊ शकतो. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)

वृश्चिक राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असणार आहे. या काळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, तुम्हाला मानसिक शांती मिळेल. खर्चात वाढ होतील पण त्यावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. घरात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल.

धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)

धनु राशीसाठी आजचा दिवस शुभकारक असणार आहे. तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. पैशांची गुंतवणूक करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. तुमची आर्थिक संपत्ती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, तुमचं आरोग्य चांगलं राहील.

मकर रास (Capricorn Weekly Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. तसेच, गुंतवणुकीसाठी हा काळ चांगला असणार आहे. तुमची ठरवलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. तसेच, नवीन लोकांशी संपर्क वाढतील.

कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)

कुंभ राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहील. घरात आनंदी वातावरण टिकून राहील. तसेच, नवीन गोष्टींचा तुम्ही लाभ घ्याल. तसेच, तुमची रखडलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील.

मीन रास (Pisces Weekly Horoscope)

मीन राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात तुम्हाला ना फायदा ना तोटा होईल. तसेच, तुम्ही नियोजित केलेली कामे तुम्हाला वेळेत पूर्ण करता येतील. समाजातील प्रतिष्ठीत लोकांबरोबर तुमच्या भेटीगाठी होतील. तसेच, मित्रांबरोबर तुमचा चांगला वेळ जाईल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी सप्टेंबर महिन्याचा चौथा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप