Weekly Horoscope 21 To 27 July 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जुलै महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. हा आठवडा काहींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. या ठिकाणी आपण सिंह आणि कन्या राशींसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope)व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे. या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत. 

सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - सिंह राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, पार्टनरकडून तुम्हाला एखादं छानसं सरप्राईज मिळेल. 

करिअर (Carrer) - कामाच्या बाबतीत तुम्हाला अनेक सकारात्मक परिणाम मिळतील. फक्त तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. तुमचं मन विचलित होऊ देऊ नका. ग्रहांच्या प्रभावामुळे करिअरवर परिणाम होऊ शकतो. 

आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसेच, तुमच्या खर्चावर लक्ष द्या. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, अनुभवी लोकांचे सल्ले घ्या.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य उत्तम असणार आहे. मात्र, आहारात बदल करणं गरजेचं आहे. भरपूर प्रमाणात पाणी प्या. नियमित योग आणि ध्यान करा. 

कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुमची लव्ह लाईफ चांगली राहील. तसेच, जोडीदाराकडून तुमच्या जास्त अपेक्षा नसतील. पार्टनरला वेळ द्याल. त्यामुळे वाद टळतील.

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या कामात काही अडचणी येतील. मात्र, त्या अडचणींचा सामना करणं गरजेचं आहे. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळेल.

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तुमचा बजेट लक्षात ठेवून पैसे खर्च करा. तसेच, व्यवसायाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. यातून तुम्हाला नफाच मिळेल.

आरोग्य (Health) - नवीन आठवडा आरोग्याच्या दृष्टीने चांगला असणार आहे. या आठवड्यात मधुमेहाच्या लोकांनी आपल्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. तसेच, रोज व्यायाम आणि योग गरजेचा आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :   

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा कसा असणार? साप्ताहिक राशीभविष्य