Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींना दिवाळीत बजेट सांभाळा! धनहानी होण्याचे संकेत? जरा जपून, साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Weekly Horoscope 20 To 26 October 2025: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 20 To 26 October 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, ऑक्टोबर (October 2025) महिन्याचा चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या दरम्यान बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होणार असल्याने शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, आठवड्यात दिवाळीचा (Diwali 2025) देखील सण आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन राशीची लव्ह लाईफ (Gemini Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - किरकोळ मतभेद होण्याची शक्यता आहे. नातेसंबंधांमध्ये संशय आणि गैरसमज वाढू शकतात. जुन्या ओळखीच्या व्यक्तीशी नवीन संवाद सुरू करू शकतात.
करिअर (Career) - नोकरीच्या शोधात असलेल्यांना कॉल किंवा मुलाखत येण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांशी चांगलं जमेल. या आठवड्यात व्यावसायिक गुंतवणूक करणे टाळावे
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक दृष्ट्या खर्चाबाबत सावधगिरी बाळगावी. दिवाळीची तयारी बजेटवर ताण येऊ शकते, विशेषतः घर सजावट किंवा भेटवस्तूंसाठी दरम्यान घरगुती खर्च वाढतील.
आरोग्य (Health) - आरोग्य उत्तम असेल. त्वचा आणि केसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नये. धुळीमुळे अॅलर्जी किंवा त्वचेवर पुरळ येऊ शकजास्त मसालेदार अन्न पोट आणि चेहरा दोघांनाही हानिकारक ठरू शकते. पुरेशी झोप आणि हायड्रेशन राखा.
कर्क राशीची लव्ह लाईफ (Cancer Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात बुधाचे संक्रमण तुमच्या आणि जोडीदाराच्या संवादात कटुता आणू शकते, म्हणून वाद टाळा. प्रेम संबंधांमध्ये अहंकार संघर्ष निर्माण करू शकते.
करिअर (Career) - ऑफिस राजकारण वाढू शकते. कामात गोंधळ किंवा घाई करू शकते. नोकरी शोधणाऱ्यांनी मुलाखती किंवा सादरीकरणादरम्यान त्यांचे शब्द काळजीपूर्वक निवडावेत
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात खर्चाबाबत काळजीपूर्वक निर्णय घ्यावेत. आर्थिक व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. दिवाळीत मोठा खर्च होऊ शकतो.
आरोग्य (Wealth) - नवीन आठवड्यात पाठीचा कणा, पाठ आणि सांध्याच्या समस्या येऊ शकतात. तळलेले किंवा मसालेदार पदार्थ मर्यादित करा. योगा आणि स्ट्रेचिंगमुळे आराम मिळेल.
हेही वाचा :
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींसाठी ऑक्टोबरचा चौथा आठवडा कसा असणार? दिवाळीत कोणत्या राशी होतील मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















