(Source: Poll of Polls)
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी ऑक्टोबरचा नवीन आठवडा कसा असेल? दिवाळीत कोणत्या राशींना मिळणार बोनस? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 20 To 26 October 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा तूळ ते मीन राशींसाठी नेमका कसा असेल ते जाणून घेऊयात.

Weekly Horoscope 20 To 26 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबरचा (October 2025) चौथा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक ग्रहांच्या हालचाली होणार आहे. तसेच, अनेक शुभ संयोग (Yog) देखील जुळून येणार आहेत. विशेष म्हणजे हा आठवडा दिवाळीचा (Diwali 2025) असल्या कारणाने अनेक राशींसाठी हा काळ शुभकारक ठरु शकतो. मात्र, या काळात कोणत्या राशींना सावध राहावं लागेल हे देखील जाणून घेणं गरजेचं आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा नवीन आठवडा (Weekly Horoscope) तूळ ते मीन राशींसाठी नेमका कसा असेल ते जाणून घेऊयात.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा मेहनतीचा असणार आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. ज्याचा भविष्यात तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तसेच, नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. जीवनात अनेक सकारात्मक बदल घडताना दिसतील.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
या राशीच्या लोकांसाठी दिवाळीचा हा आठवडा फलदायी ठरणार आहे. तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. व्यवसायाच्या अनेक नवीन संधी तुमच्यासाठी उपलब्ध होतील. तसेच, तुमच्यातील साहस आणि पराक्रम दिसून येईल. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण असेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा काहीसा संमिश्र स्वरुपाचा असणार आहे. या कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. तुमच्या कार्यात येणारे अडथळे दूर होतील. तसेच, आरोग्यात पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा झालेली दिसेल. नवीन संधी उपलब्ध होतील. तसेच, तुमच्या कामातून तुम्हाला समाधान मिळेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा स्थिरतेचा असणार आहे. या काळात तुमच्या कार्यात प्रगती दिसून येईल. तसेच, तुम्हाला एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. तुमचे प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. तसेच, धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. जुन्या मित्रांशी तुमच्या भेटीगाठी होतील.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी आठवड्याची सुरुवात चांगली असेल. तुमच्या मार्गातील सगळे अडथळे दूर होतील. तसेच, तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, कामानिमित्त तुम्हाला बाहेर जावं लागू शकतं. आरोग्य तुमचं एकदम ठणठणीत असणार आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगतीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. नवीन कार्य करण्यास तुम्ही यशस्वी व्हाल. तसेच, तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला काम करता येणार आहे. जर तुम्ही गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. आठवड्याचा शेवट अगदी आनंदात जाईल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :















