Weekly Horoscope 20 To 26 October 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या महिन्यात दिवाळी (Diwali 2025) देखील आहे. तसेच, या आठवड्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र परिवर्तन तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नात्यात संवाद साधणं गरजेचं आहे. यासाठी वेळ मिळेल तेव्हा पार्टनरशी संवाद साधा. तसेच, फिरायला जाण्याचा प्लॅन करा. आठवड्याच्या शेवटी तुमच्या पार्टनरची कुटुंबियांबरोबर भेट घडवून देऊ शकता.
करिअर (Career) - तुमच्या कामाच्या बाबतीत तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. तुमच्या क्षमतेनुसार, तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. तसेच, ऑफिसमध्ये तुम्ही केलेल्या कामाचं बॉसकडून कौतुक होईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आठवड्याच्या शेवटी तुम्हाला पैशांची कमतरता जाणवू शकते. यासाठी पैशांचा जपून वापर करा. विनाकारण कुठेही पैसा खर्च करु नका. नोकरदार वर्गातील लोकांना बोनस मिळण्याची शक्यता आहे.
आरोग्य (Health) - या आठवड्यात दिवाळी असल्या कारणाने फराळ खा पण अति प्रमाणात गोडाचं सेवन करु नका. तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मधुमेही रुग्णांनी आरोग्याची काळजी घ्यावी.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमाच्या बाबतीत थोडं सामंजस्य असणं गरजेचं आहे. अन्यथा एकमेकांचे इगो सांभाळत नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. विनाकारण पार्टनरशी वाद घालू नका.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर काही नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येऊ शकतात. स्वत:ला सिद्ध करण्याची ही संधी सोडू नका. अन्यथा तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुम्हाला पैशांच्या बाबतीत मोठा दिलासा मिळणार आहे. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या बॅंक बॅलेन्समध्ये चांगली वाढ झालेली दिसेल.
आरोग्य (Health) - मीन राशीच्या लोकांनी नवीन आठवड्यात आपल्या आरोग्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी सकस अन्नपदार्थांचं सेवन करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)