Weekly Horoscope 2 To 8 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिना लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope)जाणून घ्या.

तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लोकांचे पार्टनरबरोबर चांगले व्यवहार असतील. तुमचं वैवाहिक जीवन अधिक खुलेल. तसेच, तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर तुमच्या मनातील भावना शेअर करु शकता. प्रेमात एकमेकांचा आदर करा. कोणाच्याही भावना दुखवू नका. 

करिअर (Career) - तूळ राशीच्या करिअरबाबत बोलायचं झाल्यास, तुमच्या करिअरला चांगला वेग मिळेल. अनेक हातातून गेलेल्या संधी पुन्हा नव्याने तुम्हाला मिळतील. यासाठी तुम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं आहे.

आर्थिक स्थिती (Wealth) - तूळ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, तुम्ही खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल.

आरोग्य (Health) - तूळ राशीच्या लोकांचे आरोग्य फार संतुलित असणार आहे. या दरम्यान तुम्ही नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. तसेच, महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो.

वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवडा चांगला असणार आहे. पार्टनरबरोबर तुम्ही छान वेळ घालवू शकाल. तसेच, पार्टनरच्या भावनांचा आदर करा. वैवाहिक जीवन तुमचं फार चांगलं असणार आहे.

करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, करिअरमध्ये तुम्हाला प्रगतीच्या अनेक संधी निर्माण होतील. मल्टीटास्किंगमध्ये तुम्ही काम कराल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. विविध स्त्रोतांमधून तुम्हाला धनलाभ होईल. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल.

आरोग्य (Health) - तुमचे आरोग्य नवीन आठवड्यात सामान्य असणार आहे. या काळात वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवू शकतो. सांधेदुखीचा त्रास जाणवत असल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:     

Shukra Gochar 2025 : पुढचे 23 दिवस 'या' राशींना सावधानतेचा इशारा; शुक्राच्या संक्रमणामुळे कोसळणार संकटांचा डोंगर, पदोपदी मिळेल इशारा