Weekly Horoscope 2 To 8 February 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, फेब्रुवारीचा पहिला आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ आणि वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement

तूळ रास साप्ताहिक राशीभविष्य (Libra Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तूळ राशीच्या लोकांसाठी फेब्रुवारीचा पहिला आठवडा प्रेमाच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. या आठवड्यात काही नवीन लोकांशी तुमच्या भेटीगाठी होतील. त्यामुळे पार्टनरबरोबर संवाद साधा. भूतकाळातील गोष्टी आधीच क्लिअर करा. 

करिअर (Career) - तसेच, करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या कामाला प्राधान्य द्या. एका वेळी एकच काम हातात घ्या. तसेच, टीमवर्कमध्ये काम करताना तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. प्रगतीचे चिन्हे आहेत. सहकाऱ्यांशी सामंजस्याने व्यवहार करा. 

Continues below advertisement

आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात स्मार्ट पद्धतीने पैशांची बचत करा. घाईगडबडीत पैसे खर्च करु नका. तसेच, शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. छोट्या-मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करण्याची संधी मिळेल. 

आरोग्य (Health) - फेब्रुवारीचा पहिला आठवडा तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही शारीरिक स्वास्थ्याला जास्त महत्त्व देण्याची गरज आहे. यासाठी योग्य वेळेत जेवण करा आणि पुरेशी झोप घ्या. कोणत्याही गोष्टीचा जास्त ताण घेऊ नका. 

वृश्चिक रास साप्ताहिक राशीभविष्य (Scorpio Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - तुमचं म्हणणं पटवून देण्याबरोबरच तुमच्या पार्टनरच्या म्हणण्यालाही महत्त्व द्या. तसेच, जर तुम्ही सिंगल असाल तर या आठवड्यात तुम्हाला चांगला जोडीदार भेटण्याची शक्यता आहे. फक्त भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. 

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत तुमची जी महत्त्वाची कामे आहेत त्यांना वेळीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. काही नवीन योजना तुम्ही राबवाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या सहकाऱ्यांबरोबर व्यवहार करताना सावधानता बाळगा. जास्त पर्सनल गोष्टी शेअर करु नका. 

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सेविंग्स कशी करता येईल याकडे लक्ष द्या. तसेच, महत्त्वाच्या गोष्टींची आधी खरेदी करुन घ्या. पैसे सेविंग करण्याच्या सोप्या युक्ती वापरण्याचा प्रयत्न करा. 

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. नियमित योग आणि व्यायाम करा. तसेच, बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. तुमच्या आहारात हेल्दी पदार्थांचा समावेश करा. शरीराला पुरेसा आराम देणं गरजेचं आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हे ही वाचा :   

Shukra Rahu Dhan Yog 2026 : शुक्र-राहूचा जुळून येतोय महाशक्तिशाली राजयोग; 6 फेब्रुवारीपासून 'या' 3 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट, पैसा, नोकरी, प्रसिद्धी...