Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा पैसा दुपटीने वाढणार! मे चा नवा आठवडा कसा जाणार? कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 18 To 24 May 2026: मे महिन्याचा नवा आठवडा लवकरच सुरू होत आहे, तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 18 To 24 May 2026: मे महिन्याच्या (May 2026) नवा आठवडा लवकरच सुरु होत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 18 To 24 मे 2026 हा आठवडा अनेक राशींना आर्थिक लाभ, करिअरमध्ये प्रगती आणि नात्यांमध्ये सकारात्मक बदल देणारा ठरणार आहे. यासोबतच अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? 12 राशींपैकी तूळ ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा घर, प्रॉपर्टी आणि वाहनाशी संबंधित कामांसाठी अनुकूल आहे. भाग्याची साथ मिळेल. नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. महिलांनी आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी मे चा तिसरा आठवडा मेहनतीचे फळ मिळेल. प्रवास, भेटीगाठी आणि नवीन संपर्क यामुळे फायदा होईल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. मात्र आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. घरगुती मतभेद टाळा.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा कर्माला भाग्याची उत्तम साथ मिळेल. धार्मिक कार्य, प्रवास आणि नवीन योजना यासाठी काळ अनुकूल आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात स्थिरता राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगला काळ आहे.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी हा आठवडा कामाचे नियोजन आणि कल्पकता यामुळे यश मिळेल. करिअरमध्ये स्थिर प्रगती दिसेल. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यात वेळ जाईल. आरोग्यात किरकोळ तक्रारी जाणवू शकतात. प्रवासातून लाभ मिळेल.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे आर्थिक नियोजन महत्त्वाचे ठरेल. नोकरीत स्पर्धा वाढेल. भावनिक निर्णय टाळा. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. मित्र आणि कुटुंबाचा आधार मिळेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी भावनिकदृष्ट्या हा आठवडा कामे मार्गी लागतील. आर्थिक लाभाचे संकेत आहेत, पण खर्चही वाढेल. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. प्रेमजीवनात सकारात्मक बदल होतील. सप्ताहाच्या शेवटी मन प्रसन्न राहील.
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींना मे चा तिसरा आठवडा भाग्योदयाचा! 4 राशी गरिबीतून श्रीमंतीकडे, पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Before You Go
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या कारवाईच्या धास्तीने परळीतील पानटपऱ्यांची शटर्स डाऊन Special Report



















