Weekly Horoscope 18 To 24 August 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक सण समारंभांसह मोठ मोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष आणि वृषभ राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष राशीची लव्ह लाईफ (Aries Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - मेष राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, पार्टनरसाठी वेळ काढा. तसेच, तुमच्या नात्यात संवाद साधणं गरजेचं आहे.त्यासाठी पार्टनरबरोबर महत्त्वाच्या विषयांवर चर्चा साधा. 

करिअर (Career) - तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये तुम्हाला अनेक आव्हानं येतील. त्या आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. तसेच, तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या देखील सोपवण्यात येऊ शकतात. त्या तुम्ही प्रामाणिकपणे पार पाडणं गरजेचं आहे. 

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. मात्र, पैशांचा गैरवापर करु नका. तसेच, शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करण्याआधी योग्य व्यक्तींचा सल्ला घेणं गरजेचं आहे. 

आरोग्य (Health) - छोट्या मोठ्या आरोग्याच्या समस्या उद्भवतील. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करा. तसेच, महिलांना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी आरोग्याची काळजी घ्या. नियमित व्यायाम करणं गरजेचं आहे. 

वृषभ राशीची लव्ह लाईफ (Taurus Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमाच्या बाबतीत तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. अनेक अडथळे येऊ शकतात. मात्र, त्यावर तुम्ही मात कराल. तसेच, तुमच्या पार्टनरचा डॉमिनेटिंग स्वभाव तुमच्यावर भारी पडण्याची शक्यता आहे. 

करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत तुमचा फोकस पूर्ण राहील. तसेच, नवीन प्रोजेक्टवर काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या मूल्यांशी थोडीफार तडजोड करावी लागेल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. 

आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. या दरम्यान तुम्ही नवीन वस्तूंची खरेदी करु शकता. तसेच, तज्ज्ञांशी संपर्क साधून योग्य ठिकाणी गुंतवणूक करणं तुमच्यासाठी फार लाभदायी ठरेल. 

आरोग्य (Wealth) - या आठवड्यात तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे जड सामान उचलू नका. तसेच, जास्त चढ-उतार करु नका. अन्यथा तुम्हाला त्रास होईल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑगस्टचा तिसरा आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य