Weekly Horoscope 17-23 March 2024 : मार्च महिन्याचा तिसरा आठवडा काही राशींसाठी खास असणार आहे, तर काही राशींसाठी खडतर असणार आहे. मकर आणि मीन राशीच्या लोकांना या काळात पैसा, करिअर आणि आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मार्चचा नवीन आठवडा (17 March To 23 March Weekly Horoscope) तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या 6 राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.


तूळ रास (Libra)


तूळ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला लांबच्या प्रवासाला जातील. या आठवड्यात तुमच्या मनात चांगले विचार येतील, ज्यामुळे तुम्ही सकारात्मक राहाल. आठवड्याच्या मध्यात कामावर भावनिक निर्णय घेणं टाळा, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. या काळात कुटुंबालाही वेळ द्या. तुम्हाला कुटुंबातील सर्वांची मदत लाभेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत तुमचं उत्पन्न वाढेल. काहीतरी नवीन करण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण होईल. लव्ह लाईफमध्ये जोडीदारावरचं प्रेम वाढेल, पण भांडण होण्याचीही शक्यता आहे.


वृश्चिक रास (Scorpio)


वृश्चिक राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. तुम्ही आठवड्याच्या सुरुवातीला मोठे निर्णय घेऊ नये, अन्यथा तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आठवड्याच्या तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील. नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे. भावंडांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल. मनातील भावना वडिलांसमोर व्यक्त करण्यास संकोच करू नका. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत घरात एखादं छोटंमोठं काम निघेल. कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होऊ शकतो. ऑफिसमध्येही तुम्हाला भांडणं टाळावी लागणार आहेत.


धनु रास (Sagittarius)


धनु राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या व्यवसायात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतील आणि त्यात त्यांना यशही मिळेल. काही नवीन संपर्क जोडण्याचा तुम्हाला फायदा मिळेल. वैवाहिक जीवनातही एकमेकांना साथ देण्यासाठी हा काळ चांगला राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्ही काही स्ट्रॅटेजी बनवू शकता, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात मदत होईल. या काळात तुमची तब्येत खराब होऊ शकते, त्यामुळे काळजी घ्या. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात अचानक एखादं काम पूर्ण झाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. तुम्ही बाहेर फिरायलाही जाऊ शकता.


मकर रास (Capricorn)


मकर राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला मानसिक तणावाचा सामना करावा लागेल. सुरुवातीच्या दिवसांतच जास्त खर्च झाल्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होऊ शकतो. आठवड्याच्या मध्यात तुम्ही तुमच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवाल, तुम्हाला जोडीदाराचं प्रेम मिळेल आणि पाठिंबा देखील मिळेल. व्यवसायासाठी हा काळ चांगला राहील. आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत मात्र मोठे निर्णय घेणं टाळा आणि आरोग्याची काळजी घ्या.


कुंभ रास (Aquarius)


कुंभ राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या लव्ह लाईफमध्येच मग्न राहतील. सुरुवातीच्या काळात तुम्हाला तुमच्या प्रियकराचं सहकार्य मिळेल, तो तुम्हाला त्याच्या मनातील सर्व काही सांगू शकेल आणि तुमचे ट्यूनिंग चांगलं होईल. तुमचे उत्पन्नही चांगलं राहील. या आठवड्यात नोकरी बदलण्याचा विचार देखील तुमच्या मनात येईल. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला तुमचे शत्रू समजतील. नोकरीत तुमची स्थिती चांगली असेल. तुमच्या खर्चात थोडी वाढ होईल. आठवड्याचे शेवटचे दिवस चांगले असतील, परंतु व्यवसायात तुमचा कोणाशी तरी वाद होऊ शकतो, कारण तुमचं ट्यूनिंग त्यांच्याशी जुळणार नाही.


मीन रास (Pisces)


मीन राशीचे लोक आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबाला जास्तीच जास्त वेळ देतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवल्यासारखं वाटेल. यामुळे कौटुंबिक सुख वाढेल आणि परस्पर तणाव दूर होईल. या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी कामावर तुमचं लक्ष राहील. आठवड्याच्या मध्यात तुम्हाला मुलांकडून आनंद मिळेल, ते तुमच्यावर अतोनात प्रेम करतील. लव्ह लाईफसाठीही हा काळ रोमँटिक असेल. तुमचं उत्पन्न वाढेल. आठवड्याच्या शेवटच्या दिवसात तुमचं आरोग्य कमजोर राहील आणि खर्च देखील वाढतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Weekly Horoscope 17 To 23 March 2024 : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा राहील? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या