Weekly Horoscope 16 To 22 March 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 16 ते 22 मार्च 2026 हा आठवडा फार खास असणार आहे. ज्योतिषींच्या मते, या आठवड्यात अनेक राशींना नशिबाची साथ मिळेल. कारण या काळात ग्रहांचे मोठे संक्रमण होत आहेत, जे शुभ संकेत देत आहेत. ज्यामुळे काही राशींच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, तर काहींना सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. यामुळे मार्चचा नवीन आठवडा (Weekly Horoscope)मेष ते कन्या अशा सर्व 12 राशींसाठी नेमका कसा जाणार आहे? जाणून घेऊयात.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी मार्चचा तिसरा आठवडा सावधानतेचा असणार आहे. या काळात तुम्हाला कोणतंही पाऊल उचलताना सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, तुमच्या वाणीवर लक्ष केंद्रित करा. वेळीच संयम देखील ठेवायला शिका. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील. पैशांचा जपून वापर करा. धार्मिक कार्यात तुम्ही मनापासून सहभागी व्हाल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी मार्चचा नवीन आठवडा भरभराटीचा असणार आहे. या काळात देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती फार चांगली असेल. पैशांच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तसेच, नशिबाची तुम्हाला पूर्ण साथ मिळेल. कामाच्या संदर्भात तुम्ही प्रवास कराल. मात्र, हा प्रवास तुमच्यासाठी सुखकर असेल.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी नवीन आठवडा मिश्रित फलदायी स्वरुपाचा असणार आहे. या कालावधीत कामाच्या ठिकाणी तुमचं वर्चस्व कायम टिकून राहील. मात्र, या काळात कोणाशीही वादविवाद करु नका. यामुळे तुमची मानसिक शांती भंग होऊ शकते. धार्मिक कार्यात देखील तुमचं मन रमेल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करण्याची संधी मिळेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
कर्क राशीसाठी मार्चचा नवीन आठवडा अत्यंत शुभकारक असणार आहे. या दरम्यान तुम्हाला नवीन गोष्टींचा लाभ घेता येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. आठवड्याच्या शेवटी तु्म्हाला शुभवार्ता देखील मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला निष्काळजीपणा करुन चालणार नाही. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील काही वाद असतील तर ते लगेच मिटतीलही.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात आत्मचिंतनाची असणार आहे. या कालावधीत तुमच्यात नवीन सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. तसेच, तुमच्या वागणुकीतही थोड्याफार प्रमाणात फरक पडू शकतो. तुमच्या कामाबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या जाऊ शकतात. मात्र, तुमच्या कामावर फोकस करा. लोकांच्या चर्चेचं कारण ठरु नका. तर, तुमचा मार्ग निवडा.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी मार्चचा तिसरा आठवडा चढ-उताराचा असणार आहे. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ तर मिळेल. मात्र, तरीही तुम्ही समाधान असणार नाहीत. उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. तसेच, प्रवासातून तुम्हाला चांगलं मोटीव्हेशन मिळेल. त्यामुळे स्वत:साठी वेळ काढा. स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करा. मित्र-मैत्रीणींची साथ तुमच्यासाठी फार मोलाची ठरेल.
