Weekly Horoscope 16 To 22 June 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी धनु आणि मकर राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
धनु रास साप्ताहिक राशीभविष्य (Sagittarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - या आठवड्यात तुमचा तुमच्या पार्टनरबरोबर चांगला वेळ जाईल. नवीन नात्याची सुरुवात तुम्ही करु शकता. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांना लवकरच चांगला पार्टनर भेटेल.
करिअर (Career) - कामाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या आठवड्यात तुमच्या कामाचं प्रदर्शन करण्यास घाबरु नका. आत्मविश्वास वाढवा.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत तुम्ही थोडं सावधान असण्याची गरज आहे. तसेच, खर्चावर नियंत्रण देखील ठेवा. गरज नसल्यास पैसे खर्च करु नका. घाईगडबडीत कोणताही निर्णय घेऊ नका.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य एकदम ठणठणीत असणार आहे. त्यामुळे तुम्हाला कसलीच चिंता करण्याची गरज नाही. मात्र, नियमित योग आणि ध्यान करा.
मकर रास साप्ताहिक राशीभविष्य (Capricorn Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - मकर राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा प्रेमाच्या दृष्टीने चांगला असणार आहे. काही नात्यात तुम्हाला टॉक्सिकपणा जाणवेल अशा वेळी योग्य त्या वेळी नात्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.
करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपवण्यात येतील. तसेच, तुमच्या बॉसकडून तुमच्यावर कामाच्या खूप अपेक्षा असतील. त्या तुम्ही पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असाल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. कोणाकडून पैसे मागण्याची वेळ तुमच्यावर येणार नाही. तसेच, महिलांनी आपला बजेट सांभाळून पैसा खर्च करावा. तुमची दानशूर वृत्ती राहील.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, महिलांनी या आठवड्यात आपल्या आरोग्याबाबत विशेष काळजी घ्यायची आहे. काम करताना धारदार वस्तूंपासून दूरच राहा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: