Weekly Horoscope 16 To 22 June 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, जून महिन्याला लवकरच सुरुवात होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुमची लव्ह लाईफ चांगली असेल. फक्त तुम्ही रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो. तसेच, तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला येऊ देऊ नका.  

करिअर (Career) - तुमची प्रोफेशनल लाईफ फार चांगली आणि सकारात्मक असणार आहे. या दरम्यान तुम्हाला करिअरच्या बाबतीत फार मोठे निर्णय घ्यावे लागतील. अशा वेळी न डगमगता आत्मविश्वासाने निर्णय घ्या.  

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. फक्त पैशांच्या बाबतीत सकारात्मक निर्णय घ्या. गुंतवणूक करताना घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला किंवा मत विचारात घ्या.

आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या लाईफस्टाईलवर लक्ष देणं गरजेचं आहे. तुमची एनर्जी लेव्हल मेंटेन राहण्यासाठी रोज व्यायाम करा.

मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)

कौटुंबिक जीवन (Family) - मीन राशीच्या लव्ह लाईफमध्ये थोड्याफार प्रमाणात चढ-उतार जाणवू शकतो. काही मुलींना आई-वडिलांचा सपोर्ट मिळू शकतो. पण, नात्यात आणि नातेसंबंधांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.

करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुमचा आत्मविश्वास दिसून येईल. नवीन सहकाऱ्यांना देखील चांगलं मार्गदर्शन मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते.

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ झालेली दिसेल. मात्र, खर्चाच्या बाबतीत सकारात्मक राहण्याची गरज आहे. तसेच, गुंतवणुकीच्या बाबतीत सतर्क राहा. 

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत हलगर्जीपणा करु नका. तुमच्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थ्याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी सकस आहार घ्या. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :     

Shani Vakri 2025 : 138 दिवस शनीची वक्री चाल; सोन्यासारखं लख्खं चकाकणार 'या' 3 राशींचं नशीब, तुमच्यावर असेल शनीची कृपा?