Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना नवीन आठवड्यात मिळणार मोलाची संधी, फक्त 'हे' संकेत पाळा; साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 15 To 21 September 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15 To 21 September 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, सप्टेंबर महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात पितृपक्ष आणि सूर्यग्रहण असल्या कारणाने हा आठवडा महत्त्वाचा असणार आहे. तसेच, अनेक मोठमोठ्या ग्रहांची देखील स्थिती बदलणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तसेच, तुमची पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच, पार्टनरबरोबर कमिटमेंट ठेवाल ती पूर्ण करा.
करिअर (Career) - करिअरच्या बाबतीत तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहा. ग्रहांची स्थिती शुभ असल्या कारणाने तुमचं नुकसान होणार नाही.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झाल्यास, तुमच्या आर्थिक स्थितीत अनेक चढ-उतार येऊ शकतात. यासाठी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
आरोग्य (Health) - तुमचं आरोग्य चांगलं राहील. तसेच, वातावरणातील बदलांमुळे तुम्हाला सर्दी, तापदेखील जाणवू शकतो. अशा वेळी आरोग्याची काळजी घ्या. वाहन चालवताना योग्य काळजी घ्या.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - कन्या राशीच्या लोकांनी रिलेशनशिपमध्ये सावधानतेने वागण्याची गरज आहे. पार्टनरवर जास्त हक्क गाजवू नका. तसेच, कंट्रोलिंग स्वभाव बाजूला ठेवा. एकमेकांच्या भावनांचा आदर करा.
करिअर (Career) - कन्या राशीच्या लोकांनी करिअरच्या बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच, जे लोक नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली नोकरी मिळू शकते. तुमच्या व्यवसायावर देखील तुम्ही लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, या आठवड्यात तुम्हाला एमर्जन्सीमुळे काही पैसे खर्च करावे लागू शकतात. यासाठी पैशांचा जपून वापर करा.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत कोणत्याच पद्धतीचा निष्काळजीपणा करु नका. तसेच, मुलांना बाहेर फिरायला घेऊन जात जा. त्यांच्या क्रिएटीव्हीला चांगला वाव मिळेल. कोमट पाण्याचं सेवन करा.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :




















