Weekly Horoscope: सिंह, कन्या राशींची प्रगती सुस्साट! जूनचा तिसरा आठवडा, नशीबाचे दार उघडणार..साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 15 To 21 June 2026: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 15 To 21 June 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जून (May 2026) महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण, या आठवड्याच्या दरम्यान अनेक छोटे-मोठे ग्रहदेखील नक्षत्र तसेच, राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे जून महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) : या आठवड्यात प्रेमसंबंधांमध्ये उत्साह आणि आकर्षण वाढेल. जोडीदारासोबतचा वेळ आनंददायी जाईल. विवाहित व्यक्तींना नात्यातील जुने मतभेद मिटवण्याची संधी मिळेल. अविवाहितांना एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडे आकर्षण वाटू शकते. मात्र अहंकारामुळे नात्यात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
करिअर (Career) : करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा प्रगतीकारक राहू शकतो. नेतृत्व क्षमता आणि आत्मविश्वासामुळे वरिष्ठांचे लक्ष वेधून घ्याल. नवीन प्रकल्प, पदोन्नती किंवा जबाबदारी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायिकांना नवीन ग्राहक आणि आर्थिक संधी मिळू शकतात.
आर्थिक स्थिती (Wealth) : आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी संभवतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता असून गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. मात्र दिखाऊपणासाठी किंवा चैनीसाठी होणारा खर्च नियंत्रित ठेवणे गरजेचे राहील.
आरोग्य (Health) : ऊर्जा आणि उत्साह चांगला राहील. तरीही उष्णतेमुळे थकवा, रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित किरकोळ तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार फायदेशीर ठरेल..
कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) : नातेसंबंधांमध्ये स्थैर्य आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत भविष्याशी संबंधित महत्त्वाच्या चर्चा होऊ शकतात. अविवाहितांना कुटुंबाच्या माध्यमातून विवाहाचे प्रस्ताव मिळण्याची शक्यता आहे. भावना व्यक्त करताना जास्त विचार करण्याची सवय कमी करा.
करिअर (Career) : कामातील बारकावे आणि नियोजन यामुळे यश मिळेल. कार्यालयीन कामे वेळेत पूर्ण केल्याने वरिष्ठांचे कौतुक मिळू शकते. नोकरी शोधणाऱ्यांना चांगल्या संधी मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक हाताळा.
आर्थिक स्थिती (Wealth) : आर्थिक नियोजनासाठी हा आठवडा अनुकूल आहे. बचत वाढविणे आणि दीर्घकालीन गुंतवणुकीकडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल. अनपेक्षित खर्च उद्भवू शकतात, त्यामुळे आर्थिक शिस्त पाळणे आवश्यक राहील.
आरोग्य (Health) : आरोग्य सामान्यतः चांगले राहील. मात्र पचनसंस्था, त्वचा किंवा तणावाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. योग, ध्यान आणि संतुलित आहार यांचा लाभ होईल.
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशींच्या श्रीमंतीचा हाच योग! जूनचा तिसरा आठवडा पॉवरफुल, साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















