Weekly Horoscope 14 To 20 July 2025 : ज्योतिषशास्त्रानुसार, जुलै महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा ग्रहांच्या दृष्टीने हा आठवडा फार महत्त्वाचा आहे. कारण या दरम्यान मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा राहील? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

मेष रास (Aries Weekly Horoscope)

मेष राशीसाठी जुलै महिन्याचा नवीन आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात ग्रहांचीचाल चांगली असल्या कारणाने तुम्हाला कोणताच त्रास होणार नाही. तुमच्या शारीरिक स्वास्थ्याबरोबरच मानसिक स्वास्थही चांगलं राहील. तसेच, करिअरमध्ये सारखेपणा दिसत असल्यास जॉब स्विच करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. या आठवड्यात अनेक बदल तुमच्याबरोबर घडतील. काही चांगले काही वाईट. त्यांचा सामना करण्यासाठी तुम्ही जागृत तसेच सज्ज असणं गरजेचं आहे.   

वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)

नवीन आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं असेल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार देखील वाढलेला दिसेल. या दरम्यान तुम्ही नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा चांगला सहवास लाभेल. 

मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)

मिथुन राशीसाठी नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या दरम्यान तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. तसेच, ज्येष्ठांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. तुमच्या घरातील वातावरण फार आनंदी असेल. नवीन गोष्टी शिकण्यासाठी तुम्ही फार उत्सुक असाल. या काळात भगवान विष्णूच्या मंत्राचा जप करा. तुमचं आरोग्य चांगलं राहील. 

कर्क रास (Cancer Weekly Horoscope)

कर्क राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक ठरु शकतो. या काळात तुम्हाला त्वचेसंबंधित आजार जाणवू शकतात. तसेच, एलर्जीचा त्रासदेखील होऊ शकतो. अशा वेळी वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. कोणत्याच बाबतीत रिस्क घेऊ नका. तसेच, आत्मविश्वास गमावू नका. स्वत:ला मोटीव्हेट ठेवण्याचा प्रयत्न करा. 

सिंह रास (Leo Weekly Horoscope)

सिंह राशीसाठी जुलैचा नवीन आठवडा भाग्याचा असणार आहे. या काळात तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग मोकळे होतील. नवीन कार्याची तुम्ही सुरुवात करु शकता. तसेच, आई-वडिलांचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल. धार्मिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल. तसेच, मित्रपरिवाराचा सहवास लाभेल.

कन्या रास (Virgo Weekly Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. आठवड्याची सुरुवात चांगली असेल. तुमच्या व्यवसायात तुम्हाला चांगली प्रगती पाहायला मिळेल. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा तुम्हाला लाभ घेता येईल. या आठवड्यात तुमची रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येतील. त्यामुळे चिंता करु नका आणि ताण घेऊ नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :  

Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी ठरणार गेमचेंजर! उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार