Weekly Horoscope 14 To 20 April 2025 : एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. नवीन आठवडा अनेक राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. तर काही राशींना विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) सोप्या शब्दांत जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत नवीन आठवडा चांगला जाणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवायचं आहे. तसेच, गरजेच्या वस्तूच खरेदी करा.
वृषभ रास (Taurus Horocsope)
वृषभ राशीच्या लोकांनी आपल्या ध्येयाकडे लक्ष ठेवायचं आहे. पैशांच्या संबंधित विचारपूर्वक निर्णय घ्या. तसेच, कुटुंबियांच्या चर्चांमध्ये सहभागी व्हा.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांनी अतिशय स्थिरतेने आणि काळजीपूर्वक खर्च करणं गरजेचं आहे. जवळच्या नातेवाईकांना जपा. नात्यात दुरावा येऊ शकतो.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांवर गणपतीची कृपा असणार आहे. या आठवड्यात आत्मनिरिक्षणासाठी वेळ काढा. तसेच, व्यक्तिमत्व विकासावर भर द्या.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा रोमॅंटिक असणार आहे. या राशीच्या लोकांची ठरवलेली कामे पूर्ण होतील. तसेच, व्यवसायिक क्षेत्रात जास्त चांगली प्रगती करु शकाल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या राशीवर गणपतीची कृपा असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायावर लक्ष देणं गरजेचं आहे. तसेच, कोणताही निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या आठवड्यात समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तसेच, तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. जवळच्या मित्र-मैत्रीणींशी भेटीगाठी वाढतील.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मक बदलांचा असणार आहे. तुमच्या आयुष्यात परिवर्तन दिसून येईल. तसेच, मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष द्याल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. तसेच, व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे. देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. तसेच, तुमच्या करिअरमध्ये चांगली प्रगती दिसून येईल.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांच्या जीवनात रचनात्मक बदल दिसून येतील. नवीन विचारांचं स्वातंत्र्य असेल. तसेच, मुलांच्या अभ्यासात प्रगती दिसून येईल.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी नवीन आठवडा काहीसा आव्हानात्मक अणार आहे. त्यामुळे कोणतेही निर्णय घेताना विचारपूर्वक निर्णय घ्या. जवळच्या लोकांशी गाठीभेटी वाढतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: