Weekly Horoscope 14 To 20 April 2025 : एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा काहींसाठी शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. या ठिकाणी आपण मिथुन आणि कर्क राशीसाठी नवीन आठवडा (Weekly Horoscope)व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत नेमका कसा असणार आहे. या संदर्भात अधिक जाणून घेणार आहोत.  

मिथुन रास साप्ताहिक राशीभविष्य (Gemini Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - आठवड्याच्या सुरुवातीला जोडीदाराबरोबर तुमचे खटके उडू शकता. तसेच, तुमच्या संसारात दुसरे व्यक्ती ढवळाढवळ करु शकतात. अशा वेळी तुमचा तुमच्या पार्टनरवर विश्वास असायला हवा. आणि नातेसंबंध जपण्याचा प्रयत्न करा. 

करिअर (Carrer) - करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन आठवड्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळेल. तसेच, ऑफिसमध्ये तुमची चांगली इमेज तयार होईल. तुमच्या ध्येयावर तुमचं लक्ष केंद्रित असेल. 

आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, नवीन आठवड्यात तुम्हाला मेडिकल इमर्जन्सी साठी पैसे लागू शकतात. मात्र, याची कमतरता तुम्हाला फारशी भासणार नाही. देवी लक्ष्मीचा तुमच्यावर आशीर्वाद असेल.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्हाला आरोग्याच्या बाबतीत कोणतीच तक्रार जाणवणार नाही. मात्र, तुमच्या वाढत्या वजनावर तुम्ही वेळीच लक्ष द्यावं. यासाठी हेल्दी डाएट मेंटेन करा.

कर्क रास साप्ताहिक राशीभविष्य (Cancer Weekly Horoscope)

लव्ह लाईफ (Love Life) - कर्क राशीच्या लोकांनी आपली पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफ वेगवेगळी ठेवावी. अन्यथा तुमच्या संसारात वाद निर्माण होऊ शकतात. जोडीदाराबरोबर काही प्रमाणात वाद होऊ शकतात. मात्र, तुमच्यात प्रेम घट्ट टिकून राहील.

करिअर (Career) - हा आठवडा तुमचा प्रगतीचा असणार आहे. तुमच्या स्वप्नांना नवं बळ मिळेल. तसेच, कामाच्या निमित्ताने तुम्ही परदेशात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही फार खुश असाल. तसेच, तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल.

आर्थिक स्थिती (Wealth) - तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. जर तुम्हाला नवीन वस्तू किंवा प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर त्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. पैशांची गुंतवणूक देखील चांगली कराल.

आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत थोडे सावध राहा. महिलांना सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. अशा वेळी हलगर्जीपणा करु नका. वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:  

Weekly Horoscope : मेष आणि वृषभ राशींसठी नवीन आठवडा आत्मविश्वासाचा, करिअरला मिळणार टर्निंग पॉईंट; वाचा साप्ताहिक राशीभविष्य