Weekly Horoscope 14 To 20 April 2025 : एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope)जाणून घ्या.
मेष रास साप्ताहिक राशीभविष्य (Aries Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमची लव्ह लाईफ एकदम चांगली आणि सुरळीत चालेल. तुमच्या जोडीदाराच्या भावनांप्रती तुम्ही फार सेन्सीटिव्ह असाल. तसेच, या काळात कोणाशीही वाद-विवाद घालू नका. शांततेने समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
करिअर (Career) - जर तुम्ही क्रिएटिव्ह इंडस्ट्रीशी निगडीत असाल तर तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची बदली होण्याची शक्यता आहे. तुमच्या करिअरमध्ये प्रगती दिसून येईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, छोट्या-मोठ्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यासाठी फायनान्शियल एडव्हायजरची मदत घ्या. तसेच, तुमचा कल गुंतवणुकीकडे असावा.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुम्हाला घसादुखीचा त्रास होऊ शकतो. तसेच, गरोदर महिलांनी जास्त जड सामान उचलू नये. मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्या.
वृषभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Taurus Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - वृषभ राशीच्या लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास, या आठवड्यात तुमचे तुमच्या जोडीदाराबरोबर वाद होऊ शकतात. अशा वेळी नात्यात इगोला महत्त्वाचं स्थान देऊ नका. सामंजस्याने निर्णय घ्या. आणि एकमेकांच्या मताचा आदर करा.
करिअर (Career) - नवीन आठवड्यात तुम्ही धैर्य राखणं गरजेचं आहे. जे लोक शिक्षण विभाग, मीडिया आणि आयटी इंडस्ट्रीशी संबंधित आहेत त्यांना या आठवड्यात चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात सकारात्मक परिणाम दिसतील.
आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमच्या धनसंपत्तीत चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, पैशांचा गैरवापर करु नका. तसेच, कोणालाही जास्त मोठी रक्कम दान म्हणून देऊ नका. तुमच्या पैशांच्या बाबतीत तुम्ही सावधान असणं गरजेचं आहे.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, आरोग्याच्या बाबतीत कोणताही हलगर्जीपणा करु नका. नियमित व्यायाम आणि योगा करा. सकस आहार घ्या. मानसिक शांतीसाठी या गोष्टी गरजेच्या आहेत.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा:
