Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींना नवीन आठवड्यात 'या' दिवशी होणार धनलाभ; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 13 To 19 October 2025 : तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 13 To 19 October 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, ऑक्टोबर (October 2025) महिन्याचा तिसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थाने खास असणार आहे. कारण या दरम्यान बुध आणि शुक्र ग्रहाचा शुभ संयोग जुळून येणार आहे. तसेच, आठवड्याच्या शेवटी दिवाळीचा (Diwali 2025) देखील सण आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सिंह आणि कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
सिंह रास साप्ताहिक राशीभविष्य (Leo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - तुमच्या प्रेमसंबंधांविषयी बोलायचं झाल्यास, नातेसंबंधात गोडवा निर्माण होईल. नवविवाहितांसाठी हा काळ अनुकूल आहे. सिंगल लोकांना लग्नाचे नवीन प्रस्ताव येऊ शकतात.
करिअर (Career) - कामात यश मिळेल. तुमच्या मेहनतीचं फळ नक्कीच मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. तसेच, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. नोकरीत प्रमोशनही मिळण्याची शक्यता आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात देवी लक्ष्मीची तुमच्यावर विशेष कृपा असणार आहे. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ तुमच्यासाठी फार शुभकारक असणार आहे.
आरोग्य (Health) - शारीरिक ऊर्जेत वाढ दिसेल. व्यायाम सुरू ठेवणे फायदेशीर ठरेल. तसेच, नियमित आरोग्यासाठी पुरेशी झोपही तितकीच गरजेची आहे.
कन्या रास साप्ताहिक राशीभविष्य (Virgo Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - नात्यात भावनिक स्थैर्य येईल. काही जणांना साखरपुड्याचे योग निर्माण होतील. नवीन लोकांशी भेटीगाठी होतील. पार्टनरबरोबर छानशा ठिकाणी फिरायला जाल.
करिअर (Career) - नवीन आठवड्यात तुमच्यासाठी शिकण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. स्वतःच्या कौशल्यांचा योग्य वापर करा. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी सहकार्य ठेवा.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी चांगला काळ आहे. जुने पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. यासाठी पैशांची बचत करा.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुमचं मन प्रसन्न राहील. मात्र, स्क्रीन टाईम कमी करा आणि झोपेचं वेळापत्रक पाळा. तसेच, नियमित आहार घेणं गरजेचं आहे.
हेही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)















