Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 3 राशींचे कष्ट संपले! 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? कोणाचा भाग्योदय? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 11 To 17 May 2026: मे महिन्याचा नवा आठवडा सुरू झाला आहे, व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? तूळ ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 11 To 17 May 2026: अखेर मे महिन्याच्या (May 2026) दुसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 11 ते 17 मे 2026 हा आठवडा अत्यंत खास आहे. या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा आर्थिक सुधारणा देणारा राहील. नवीन संपर्क आणि ओळखी भविष्यात फायदेशीर ठरतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल. काहींना प्रवासाचे योग संभवतात. आरोग्य सामान्य राहील, पण झोप पूर्ण घेणे आवश्यक आहे.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी मे चा दुसरा आठवडा कामाचा ताण आणि मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. नोकरीत काही लोक तुमच्या विरोधात बोलू शकतात, पण संयम ठेवल्यास परिस्थिती सुधारेल. प्रेमसंबंधात गैरसमज टाळा. आरोग्याकडे विशेष लक्ष द्या, विशेषतः थकवा आणि रक्तदाबासंबंधी समस्या जाणवू शकतात.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा प्रवास, नवीन योजना आणि सकारात्मक संधी घेऊन येणारा हा आठवडा ठरेल. करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे आहेत. आर्थिक लाभ होईल, पण खर्चही वाढेल. प्रेमसंबंधात आनंद आणि जवळीक वाढेल. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन लागेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला राहील.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी हा आठवडा तुमच्यासाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत प्रगतीकारक राहील. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि कामातील अडथळे कमी होतील. काहींना नवीन नोकरी, प्रमोशन किंवा आर्थिक लाभाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा तुमच्यासाठी चांगला ठरेल. करिअरमध्ये नवीन दिशा मिळू शकते. क्रिएटिव्ह आणि टेक्निकल क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत आठवडा सामान्य राहील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी भावनिकदृष्ट्या हा आठवडा संवेदनशील राहू शकतो. अनेक गोष्टींचा जास्त विचार केल्यामुळे मानसिक तणाव जाणवू शकतो. नोकरीत मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील, पण संयम ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक निर्णय घाईत घेऊ नका. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल आणि घरातील वातावरण शांत राहील. प्रेमसंबंधात भावना व्यक्त करण्यासाठी योग्य वेळ आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात लक्ष केंद्रित राहील.
हेही वाचा
Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींनो सज्ज व्हा! 4 राशी कोट्यधीश होण्याच्या अगदी जवळ, 'मे' चा नवा आठवडा कसा जाणार? साप्ताहिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



















