Weekly Horoscope 11 To 17 May 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार, मेचा (May 2026)महिना सुरु झाला आहे. लवकरच मेच्या दुसऱ्या आठवड्याची सुरुवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 11 ते 17 मे 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे. या आठवड्यात काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी तूळ ते मीन या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीसाठी नवीन आठवडा फार खास असणार आहे. या काळात तुमची भावनिक बाजू दिसून येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. तसेच, तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करु शकता. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे नवीन प्रस्ताव येतील. तुमच्या हातून एखादं महत्त्वाचं काम पूर्ण होईल.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीसाठी मेचा दुसरा आठवडा भाग्यशाली असणार आहे. आर्थिक बाबतीत तुम्हाला सावधानता बाळगण्याची गरज आहे. तसेच, महत्त्वाच्या कामांना प्रोत्साहन द्याल. तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. तसेच, मित्रपरिवाराबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. लवकरच परदेशात जाण्याची संधी मिळेल.
धनु रास (Saggitarius Weekly Horoscope)
धनु राशीसाठी नवीन आठवडा सकारात्मकतेचा असणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती दिसून येईल. तसेच, यात्रेला जाण्याचे शुभ योग संभवतायत. नवीन सरकारी योजनांचा तुम्ही लाभ घ्याल. नात्यात तुमच्या गोडवा दिसून येईल. तसेच, तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीसाठी नवीन आठवडा स्थिरतेचा असणार आहे. त्याचबरोबर काहीसा आव्हानात्मक असणार आहे. या कालावधीत पैशांचा जपून वापर करा. विनाकारण पैसे खर्च करु नका. तसेच, तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला हळुहळू मिळेल. त्यामुळे ध्येयावर लक्ष केंद्रित करा. मानसिक शांतीसाठी ध्यान, योग आणि व्यायाम गरजेचा आहे.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीसाठी नवीन आठवडा आव्हानात्मक असणार आहे. या कालावधीत तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागेल. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची वागणूक तुम्हाला सहन करावी लागेल. नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा काळ चांगला असणार आहे. नात्याच्या बाबतीत प्रामाणिक राहा. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीसाठी हा काळ चांगला असणार आहे. तसेच, घरात आनंदी वातावरण पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवर देखील काम करु शकता. पैशांच्या बाबतीत सावध राहा. कोणालाही विनाकारण पैसे देऊ नका. तसेच, या काळात तुम्हाा तुमची रखडलेली कामे पूर्ण करता येतील. कोर्ट कचेरीच्या संदर्भातील वाद मिटतील.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :
