Weekly Horoscope: मिथुन, कर्क राशींसाठी 'मे' चा नवा आठवडा करिअरमध्ये मोठे बदल, आर्थिक उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील...साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 11 To 17 May 2026: तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 11 To 17 May 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक छोट्या मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. त्यामुळे हा आठवडा काही राशींसाठी प्रगती, संधी आणि थोडी सावधगिरी घेऊन येणारा आहे. मे महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मिथुन रास (Cancer Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी हा आठवडा रोमँटिक राहू शकतो. विवाहित व्यक्तींमध्ये संवाद वाढेल आणि जुने मतभेद कमी होतील.
करिअर (Career) - करिअरच्या दृष्टीने हा काळ प्रगतीकारक ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांना नवीन प्रोजेक्ट, जबाबदारी किंवा पद बदलाची संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि नेटवर्किंगमधून चांगला फायदा होईल.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत आठवडा सकारात्मक राहील. अचानक आर्थिक लाभ किंवा अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत मिळण्याची शक्यता आहे. मात्र खर्चही वाढू शकतो, विशेषतः प्रवास, गॅझेट्स किंवा घरगुती गोष्टींवर पैसा खर्च होईल. आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात फायदा होईल.
आरोग्य (Health) - आरोग्याच्या बाबतीत मानसिक थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. सततच्या धावपळीमुळे तणाव वाढू शकतो. स्वतःला थोडा आराम देणे आवश्यक आहे. योग, ध्यान आणि नियमित दिनचर्या फायदेशीर ठरेल.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - प्रेमसंबंधांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात जवळीक वाढेल आणि नात्यात स्थैर्य जाणवेल. जुन्या गैरसमजुती दूर होऊ शकतात.
करिअर (Career) - मिथुन राशीच्या लोकांना हा आठवडा तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. करिअर, पैसा आणि सामाजिक प्रतिष्ठा या तिन्ही क्षेत्रांत सकारात्मक बदल दिसू शकतात. तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि वरिष्ठांकडून मान-सन्मान मिळू शकतो. काहींना नवीन नोकरी, प्रमोशन किंवा अपेक्षित संधी मिळण्याचे संकेत आहेत.
आर्थिक स्थिती (Wealth) - या आठवड्यात आर्थिक बाबतीत आठवडा मजबूत राहील. उत्पन्न वाढण्याचे योग आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करार किंवा फायदेशीर व्यवहार मिळण्याची शक्यता आहे. मात्र भावनेत येऊन खर्च करणे टाळा.
आरोग्य (Wealth) - आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा तुलनेने चांगला असला तरी भावनिक ताण टाळणे आवश्यक आहे. जास्त विचार करणे आणि चिंता यामुळे मानसिक थकवा येऊ शकतो. पाण्याचे सेवन वाढवा आणि पुरेशी झोप घ्या.
हेही वाचा
साडेसातीचं भय नाही! इतर ग्रहांची हिंमत नाही, शनिदेवांचं 'या' 5 राशींवर भरभरून प्रेम, संकटातून अलगद बाहेर येतात, ज्योतिषशास्त्र
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Before You Go
Sushma Andhare On Operation Tiger : ओमराजेंबद्दल गौप्यस्फोट, सुषमा अंधारेंची खळबळजनक पत्रकार परिषद



















