Weekly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशींपैकी 4 राशी श्रीमंतीकडे! मे च्या दुसरा आठवड्यात कोण मालामाल? साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 11 To 17 May 2026: मेष ते कन्या या राशींचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 11 To 17 May 2026: मे चा (May 2026) सुरु झाला आहे. मे च्या दुसऱ्या आठवड्याची लवकरच सुरुवात होणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, 11 ते 17 मे 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे. अनेक लोकांसाठी करिअरमध्ये नवीन संधी, आर्थिक नियोजन आणि नातेसंबंध सुधारण्याचा हा काळ असू शकतो. काही राशींना अचानक खर्च, मानसिक ताण किंवा निर्णयांमध्ये सावधगिरी बाळगावी लागेल. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. तसेच, अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी मे चा दुसरा आठवडा तुमची कार्यक्षमता वाढलेली दिसेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि मेहनतीची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. नोकरी बदलाचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. आर्थिकदृष्ट्या पैसा येईल, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा स्थैर्य आणि समाधान देणारा राहील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि अडकलेली कामे पूर्ण होतील. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. वैवाहिक जीवनात समजूतदारपणा वाढेल. प्रेमसंबंधात छोट्या गोष्टींवरून गैरसमज निर्माण होऊ शकतात,
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल. करिअरमध्ये बदल, नवीन प्रोजेक्ट किंवा प्रवासाचे योग आहेत. मीडिया, कम्युनिकेशन, डिजिटल क्षेत्र आणि मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्यांना विशेष फायदा होऊ शकतो. आर्थिकदृष्ट्या आठवडा चांगला असला तरी अनावश्यक खर्च वाढू शकतो. मित्र आणि भावंडांचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंधात रोमँटिक वातावरण राहील.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती, मान-सन्मान आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. काहींना नवीन नोकरी किंवा प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरतील. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्य चांगले राहील
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात समाजात आणि कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीत वरिष्ठांकडून कौतुक होईल. कुटुंबीयांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात आनंद राहील. मात्र कामाच्या तणावामुळे थकवा जाणवू शकतो.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात संयम आणि नियोजन यांची गरज भासेल. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण शांतपणे निर्णय घेतल्यास परिस्थिती सुधारेल. आर्थिक बाबतीत खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे बजेट सांभाळा. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते
हेही वाचा
Baba Vanga: बाबा वेंगाची 'मे' च्या दुसऱ्या आठवड्याची भविष्यवाणी समोर! वृषभ, कुंभ, कर्कसह 'या' 5 राशींच्या नशीबी श्रीमंतीचे योग! पैसा, नोकरी, प्रेम..
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Before You Go
Mountaineer Umesh Zirpe On Majha Katta : यावेळीची मोहीम कशी होती? झिरपेंनी सांगितला थरारक अनुभव



















