Weekly Horoscope 11 To 17 May 2026: आजपासून मे महिन्याच्या (May 2026) दुसऱ्या आठवड्याची सुरुवात झाली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, 11 ते 17 मे 2026 असा या आठवड्याचा कालावधी आहे. या आठवड्यात अनेक शुभ ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर काहींना आर्थिक फटका बसणार आहे. या आठवड्यात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. मे महिन्याचा नवा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? यासाठी मेष ते कन्या या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी मेचा दुसरा आठवडा कामाच्या ठिकाणी तुमची मेहनत आणि नेतृत्वगुण विशेष लक्ष वेधून घेतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. काहींना नवीन जबाबदारी किंवा नोकरीसंबंधित चांगली बातमी मिळू शकते. आर्थिक बाबतीत अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे पैशांचे नियोजन महत्त्वाचे ठरेल. रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. प्रेमसंबंधात सकारात्मक बदल दिसतील. आरोग्यात थकवा आणि झोपेची कमतरता जाणवू शकते.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा आर्थिक स्थैर्य आणि मानसिक समाधान देणारा हा आठवडा ठरेल. व्यवसायात नवीन संपर्क फायदेशीर ठरतील. नोकरी करणाऱ्यांना सहकार्य आणि स्थिरता मिळेल. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद राहील. प्रेमसंबंधात संवाद स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा नवीन संधी आणि बदल घेऊन येणारा राहील. मीडिया, कम्युनिकेशन, डिजिटल किंवा मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. प्रवासाचे योग संभवतात. आर्थिक लाभाची शक्यता आहे, पण खर्चही वाढू शकतो. मित्र आणि भावंडांचे सहकार्य मिळेल. मानसिक तणाव कमी करण्यासाठी विश्रांती आवश्यक आहे.
कर्क रास (Cancer Horoscope)
कर्क राशीसाठी नवीन आठवडा सर्वात लाभदायक ठरू शकतो. करिअरमध्ये प्रगती, प्रमोशन किंवा नवीन नोकरीचे संकेत मिळू शकतात. व्यवसायात नवीन करार फायदेशीर ठरतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. घरातील वातावरण आनंदी राहील आणि कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील. आरोग्य चांगले राहील, पण भावनिक ताण टाळा
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीसाठी यश वाढवणारा हा आठवडा ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीत वरिष्ठांकडून विशेष मान्यता मिळेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील. मात्र कामाच्या तणावामुळे थकवा जाणवू शकतो. विश्रांती आणि योग्य आहार आवश्यक आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा संयमाचा असेल, कामात काही अडथळे येऊ शकतात, पण शांतपणे निर्णय घेतल्यास यश मिळेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा चांगला राहील. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. योग आणि ध्यान मानसिक शांतता देतील.
हेही वाचा
