Weekly Horoscope 11 To 17 August 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. कारण या आठवड्यात मोठ मोठ्या ग्रहांच्या हालचाली देखील होणार आहेत. ऑगस्ट महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? कुंभ आणि मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
कुंभ रास साप्ताहिक राशीभविष्य (Aquarius Weekly Horoscope)
लव्ह लाईफ (Love Life) - कुंभ राशीच्या लोकांचं लव्ह लाईफ सुरळीत चालेल. तुम्ही दोघे एकमेकांना छान वेळ द्याल. तसेच, एकमेकांच्या सवयी जोपासण्याचा आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न कराल. या दरम्यान अहंकाराला स्थान देऊ नका.
करिअर (Career) - नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या ठिकाणी चांगला दिलासा मिळेल. तुमची बदली होण्याची शक्यता आहे. अशा वेळी कामावर योग्य लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे.
आर्थिक स्थिती (Wealth) - कुंभ राशीच्या आर्थिक स्थितीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. इतरांना मदत करण्यापूर्वी दिग्गजांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.
आरोग्य (Health) - नवीन आठवड्यात तुम्ही तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच, हेल्दी लाईफस्टाईल आचरणात आणणं गरजेचं आहे.
मीन रास साप्ताहिक राशीभविष्य (Pisces Weekly Horoscope)
कौटुंबिक जीवन (Family) - नातेसंबंधात प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता ठेवा. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवण्याची संधी मिळेल.
करिअर (Career) - हा आठवडा नोकरीत स्थिरता राहील आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात. तुम्हाला व्यवसायात मोठी ऑर्डर मिळू शकते.
आर्थिक स्थिती (Wealth) - आर्थिक बाबतीत बोलायचं झाल्यास, हा आठवडा तुमच्यासाठी नवीन शक्यता आणि प्रगती दर्शवणारा आहे. जुन्या कामात यश मिळू शकते.
आरोग्य (Health) - या आठवड्यात पोटाशी संबंधित समस्या असू शकतात, त्यामुळे आहाराची काळजी घ्या.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)