Weekly Horoscope 10 To 16 November 2025 : हिंदू कॅलेंडरप्रमाणे, नोव्हेंबर महिन्याचा (November 2025) दुसरा आठवडा लवकरच सुरु होतोय. ज्योतिषशास्त्रानुसार, या आठवड्यात अनेक शुक्र, गुरु आणि सूर्य ग्रहांच्या संक्रमणाबरोबरच अनेक शुभ ग्रहांचा शुभ संयोग जुळून होतोय. ग्रहांच्या या हालचालीमुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. तर, काही राशींना सावध राहण्याची गरज आहे. तसेच, 10 ते 16 नोव्हेंबर 2025 हा आठवडा अनेक अर्थांनी खास असणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मेष ते कन्या राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
मेष रास (Aries Weekly Horoscope)
मेष राशीसाठी नवीन आठवडा नवी उमेद घेऊन येणारा ठरणार आहे. या काळात तुमच्या कामकाजात गती पाहायला मिळेल. तलेच, जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करायला तुम्ही सुरुवात कराल. तसेच, काही जबाबदाऱ्या देखील तुमच्यावर सोपवल्या जातील. या सर्वांमध्ये तुम्हाला ताळमेळ साधायचा आहे. आठवड्याच्या शेवटी बजेट थोडासा कोलमडला असेल.
वृषभ रास (Taurus Weekly Horoscope)
वृषभ राशीसाठी नवीन आठवडा लाभदायी ठरेल. या आठवड्यात तुम्ही सरकारच्या काही नवीन योजनांचा लाभ घ्याल. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी पुरेसं भांडवल तुमच्याकडे असेल. तसेच, कामाच्या ठिकाणी तुमच्या वर्तनाचा गांभीर्याने विचार केला जाईल. नवीन गोष्टी शिकता येतील. मात्र, कोणाच्याही आयुष्यात नाक खुपसू नका. तत्वात न बसणाऱ्या गोष्टी करु नका.
मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)
मिथुन राशीसाठी आठवड्याची सुरुवात थोडी स्थिर होऊ शकते. हळुहळू तुमच्या कामाला गती मिळेल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तसेच, जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. आरोग्यावर थोडं लक्ष देण्याची गरज आहे. खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा.
कर्क रास (Cancer Weekly Horoscope)
नोव्हेंबरचा नवीन आठवडा तुमच्यासाठी आत्मपरिक्षणाचा असणार आहे. या काळात तुमच्या करिअरमध्ये काही बदल घडू शकतात. तसेच, कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा पाठिंबा तुमच्यासाठी मोलाचा ठरणार आहे. या कालावधीत तुम्हाला परदेशात जाण्याची संधीदेखील मिळू शकते. कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण होईल. तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळेल.
सिंह रास (Leo Weekly Horoscope)
नवीन आठवडा कर्क राशीसाठी लकी ठरणार आहे. तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होताना दिसतील. जर तुम्ही व्यवसायिक असाल तर तुमच्या कामात भरभराट दिसून येईल. देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील. त्यामुळे मार्गातील अडथळे दूर होतील. मुलांना नवीन गोष्टी शिकता येतील. कुटुंबात तुम्हाला या काळात शुभवार्ता ऐकायला मिळू शकते.
कन्या रास (Virgo Weekly Horoscope)
कन्या राशीसाठी आठवड्याची सुरुवात भाग्यशाली ठरेल. काही चढ-उतार येतील पण त्याचा सामना करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. नोकरीत प्रगतीचे संकेत मिळतील. तसेच, गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल. कलागुणांना वाव देता येईल. या आठवड्यात तुम्हाला मानसिक शांती मिळेल. नातेसंबंध अधिक घट्ट होतील. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :