Weekly Horoscope 10 To 16 November 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, नोव्हेंबर महिन्याचा दुसरा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. या आठवड्यात अनेक मोठ मोठ्या ग्रहांची हालचाल पाहायला मिळेल. तसेच, नोव्हेंबरचा महिना देखील सुरु होणार आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? मिथुन आणि कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.

Continues below advertisement


मिथुन रास (Gemini Weekly Horoscope)


लव्ह लाईफ (Love Life) - नवीन आठवड्यात तुम्ही पार्टनरबरोबर छान वेळ घालवाल. तसेच, जे लोक सिंगल आहेत त्यांना चांगला पार्टनर भेटण्याची शक्यता आहे. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. 


करिअर (Career) - या काळात तुमच्या करिअकमध्ये देखील तुम्हाला सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. नवीन प्रोजेक्टवर काम करताना सहकाऱ्यांचा देखील तुम्हाला चांगला सपोर्ट मिळेल. मानसिक शांती देखील मिळेल. 


आर्थिक स्थिती (Wealth) - पैशांच्या बाबतीत तुम्ही निष्काळजीपणा करु नका. तसेच, या आठवड्यात अप्रात्यक्षिकपणे तुमचे पैसे खर्च होऊ शकतात. त्यामुळे जिथे गरज असेल तिथेच पैसे खर्च करा. 


आरोग्य (Health) - नवीन आठवडा तुमचा चांगला जाईल. फक्त आरोग्याच्या बाबतीत काळजी घेण्याची गरज आहे. मानसिक शांतता आणि पुरेशी झोप मिळाल्यास तुमचं आरोग्य निरोगी राहील. 


कर्क रास (Cancer Weekly Horoscope)


लव्ह लाईफ (Love Life) - विश्वास आणि प्रेमाच्या आधारावर तुमचं नातं टिकून राहील. त्यामुळेच तुमच्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीला स्थान देऊ नका. कोणत्याही गोष्टीचा नीट विचारपूर्वक निर्णय घ्या. 


करिअर (Career) - कामाच्या ठिकाणी तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं काम करावं. तुमच्या कामावर इतरांचं लक्ष असू शकतं. त्यामुळे कोणाच्याही नजरेत येऊ नका. कामाचा जरा अतिताण तुम्हाला जाणवू शकतो. 


आर्थिक स्थिती (Wealth) - नवीन आठवड्यात तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहील. तुम्हाला परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. तसेच, पार्टनरबरोबर तुम्ही एखाद्या नवीन कार्याची सुरुवात देखील करु शकता. 


आरोग्य (Health) - बदलत्या वातावरणामुळे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास जाणवू शकतो. यासाठी बाहेरचे तेलकट अन्नपदार्थ खाऊ नका. महिलांनी सांधेदुखीचा त्रास झाल्यास वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधावा.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  


हेही वाचा :


Weekly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी नोव्हेंबरचा दुसरा आठवडा नेमका कसा असणार? कोणत्या राशींचं भाग्य उजळणार? साप्ताहिक राशीभविष्य